माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) रूपरेषा ठरवण्यावर सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा

Posted On: 08 JUL 2022 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022


53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 20 नोव्हेंबर ते 28  नोव्हेंबर 2022 या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाबद्दल ताजी माहिती www.iffigoa.org वर मिळू शकेल.

जगभरातले चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवण्यासाठी आणि सर्व ठिकाणांहून चित्रपट माध्यमाची सर्वोत्कृष्टता सादर करण्यासाठी सामायिक मंच पुरवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. विविध चित्रपट संस्कृती एकत्र आणतानाच, महोत्सव विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये समजून घेण्यासाठी आणि  जागतिक चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी एक माध्यम बनतो. चित्रपट महोत्सव संचालनालय(माहिती आणि प्रसारण, भारत सरकारच्या अंतर्गत) आणि गोवा सरकार संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन करत असतात.

चित्रपट कलेची सर्वोत्कृष्टता सादर करण्यासाठी एक सामायिक मंच पुरवण्याचा उद्दिष्टासह, इफ्फी महोत्सव दरवर्षी भारत आणि जगभरात तयार झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांचा सन्मान करतो. 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालन करण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.

सुकाणू समितीचे कार्य इफ्फी कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम करणे ही असून यामध्ये इफ्फी कार्यक्रम, मास्टर क्लासेस आणि कार्यशाळा, सांस्कृतिक घटक यांचा समावेश आहे.

सुकाणू समितीच्या बैठकीत इफ्फीच्या विविध घटकांवर उहापोह करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक यांच्याशी सहकार्य वाढवण्याचे, प्रादेशिक चित्रपटांचा सहभाग, तरूण चित्रपट दिग्दर्शकांना मंच उपलब्ध करून देणे तसेच चित्रपटांतील नवे बदलांचे तसेच  चित्रपट प्रेमींचा अनुभव समृद्ध करेल, अशा उगवत्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन कसे वाढवता येईल याविषयीच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. इफ्फी आयोजनाच्या  अगोदर सुकाणू समिती अनेक बैठका घेणार असून चित्रपटांच्या निवडीवर विचार केला जाऊन भागीदारीची शक्यता पडताळून पाहिली जाईल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, माझा इफ्फीसंदर्भात दृष्टीकोन भारतीय चित्रपट क्षेत्रातील लोकांशी जवळीकीने काम करून त्यांचे नैपुण्य आणि अंतर्दृष्टीचा उपयोग करून 53 वा इफ्फी अधिक उंचीवर नेऊन ठेवणे हा आहे. ते म्हणाले की इफ्फी हा असा महोत्सव आहे की ज्याचा उद्देश ,भारतीय सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सहकार्य आणि नेटवर्किंग पुरवताना चित्रपट व्यवसायाला चित्रपट उद्योगाच्या फायद्यासाठी चालना देण्याचा आहे. त्यांनी पुढे सांगितले की,  सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्ये प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन व्यावसायिक घडवण्याची क्षमता आणि प्रतिभा आहे ज्यामुळे भारताला जगातील आशय आणि निर्मितीनंतरच्या उत्पादनांचे केंद्र म्हणून परिवर्तित करण्यास मदत होईल.

https://iffigoa.org/wp-content/uploads/2022/06/53rd-IFFI-poster.jpg

सुकाणू समितीचे सदस्य

अधिकृत सदस्य

  1. माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री (अध्यक्ष)
  2. गोव्याचे मुख्यमंत्री (सहअध्यक्ष)
  3. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  4. माहिती आणि प्रसारण सचिव
  5. मुख्य सचिव, गोवा सरकार
  6. अतिरिक्त सचिव आणि एफ ए, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  7. अतिरिक्त सचिव, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  8. संयुक्त सचिव (चित्रपट), माहिती आणि प्रसारण मंत्रालय
  9. पीआर महासंचालक, पीआयबी
  10. व्यवस्थापकीय संचालक, एनएफडीसी
  11. सचिव (आय अँड पी), गोवा  सरकार
  12. उपाध्यक्ष, ईएसजी, गोवा
  13. मुख्य कार्यकारी अधिकारी, इएसजी, गोवा

 

अशासकीय सदस्य

  1. मनोज मुंटाशीर
  2. विपुल अमृतलाल शहा
  3. प्रसून जोशी
  4. प्रियदर्शन
  5. खुशबू सुंदर
  6. ह्रिशिता भट
  7. वाणी त्रिपाठी
  8. करण जोहर
  9. सुखविंदर सिंग
  10. निखिल महाजन
  11. रवी कोट्टाराकारा
  12. शूजित सरकार
  13. बॉबी बेदी


* * *

S.Patil/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840240) Visitor Counter : 571


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi