दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ब्रिक्स सदस्य देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या आठव्या परिषदेत केन्द्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी
दूरसंचार क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणा केल्या अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2022 5:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
ब्रिक्स सदस्य देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची आठवी परिषद काल चीनच्या अध्यक्षतेखाली आभासी माध्यमातून झाली. या बैठकीत केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रि अश्विनी वैष्णव सहभागी झाले होते. आयसीटी क्षेत्रात भारताच्या कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये त्यांनी यावेळी मंडळी. तसेच, दूरसंचार क्षेत्रात भारत सरकारने केलेल्या सुधारणाही त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केल्या.
ब्रिक्स सदस्य देशांच्या 23-24 जून 2022 मध्ये झालेल्या 14 व्या शिखर परिषदेत आयसीटी क्षेत्रात, निश्चित करण्यात आलेल्या काही विभागांमधील काम पुढे नेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. भविष्यातील नेटवर्क साठी ब्रिक्स संस्था (BIFN), डिजिटल ब्रिक्स कृतीदल (DBTF), यांच्यासाठी जे कां निश्चित करण्यात आले आहे, त्याची सर्वच मंत्र्यांनी प्रशंसा केली. या यंत्रणांमुळे, ब्रिक्स देशातील नवोन्मेषविषयक सहकार्य अधिक दृढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीत, ब्रिक्स दूरसंचार मंत्र्यांच्या आठव्या परिषदेचा जाहीरनामाही स्वीकारण्यात आला. आधार, कोविन, युपीआय आणि दीक्षा यासारख्या कल्याणकारी डिजिटल योजनांचा प्लॅटफॉर्म भारताने सदस्य देशांना देऊ केला, त्याचे सर्व मंत्र्यांनी कौतूक केले आणि भविष्यात या क्षेत्रात सहकार्य वाढवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
R.Aghor /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1839887)
आगंतुक पटल : 223