आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 198कोटी 33 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 3 कोटी 71 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,19,457

गेल्या 24 तासांत देशात 18,930 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.52%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.86% आहे

Posted On: 07 JUL 2022 9:35AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 198 कोटी 33 लाखांचा  (1,98,33,18,772) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,59,53,259 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 71 लाखांहून अधिक (3,71,62,944) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,09,340

2nd Dose

1,00,69,432

Precaution Dose

57,95,053

FLWs

1st Dose

1,84,24,993

2nd Dose

1,76,33,392

Precaution Dose

1,06,35,939

Age Group 12-14 years

1st Dose

3,71,62,944

2nd Dose

2,45,15,244

Age Group 15-18 years

1st Dose

6,05,98,267

2nd Dose

4,92,82,099

Age Group 18-44 years

1st Dose

55,84,51,676

2nd Dose

50,30,59,101

Precaution Dose

34,58,590

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,80,253

2nd Dose

19,38,35,910

Precaution Dose

28,05,587

Over 60 years

1st Dose

12,72,92,681

2nd Dose

12,10,91,331

Precaution Dose

2,53,16,940

Precaution Dose

4,80,12,109

Total

1,98,33,18,772

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,19,457 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.27% आहे.
 


 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.52% झाला आहे. गेल्या 24 तासांत 14,650 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,29,21,977 झाली आहे.


 
गेल्या 24 तासांत, देशात नव्या 18,930 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

 

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,38,005 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 86 कोटी 53 लाखांहून अधिक (86,53,43,689) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 
देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.86% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.32%. इतका नोंदला गेला आहे.

 

 
****


 Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839751) Visitor Counter : 164