नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन तसेच ड्रोनच्या सुट्या भागांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 23 लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2022 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2022

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने  ड्रोन तसेच ड्रोनच्या सुट्या भागांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत  23 लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 12 ड्रोन उत्पादक आणि ड्रोनच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या 11  उत्पादकांचा समावेश आहे. मंत्रालयाने 4 मे 2022 रोजी पात्र उत्पादकांकडून अर्ज मागवले होते आणि ते सादर करण्याची 20 मे 2022 ही शेवटची तारीख होती.

2021-22 साठी लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निकाल आणि इतर माहितीच्या आधारे पीएलआय लाभार्थ्यांची तात्पुरती यादी  तयार करण्यात आली आहे. यात निवड झालेल्या  लाभार्थ्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विक्री महसूल आणि मूल्यवर्धनाशी संबंधित पात्रता निकष पूर्ण केले  आहेत.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सार्वजनिक सूचनेसाठी येथे क्लिक करा:

https://www.civilaviation.gov.in/sites/default/files/Second%20provisional%20list%20of%20beneficiaries%20under%20PLI%20Scheme%20for%20drones%20and%20drone%20components.pdf    

निवडण्यात आलेल्या ड्रोन उत्पादकांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन कंपन्या आहेत :

i आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, मुंबई,

viii सागर डिफेन्स इंजिनिअरिंग, पुणे

सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या  उत्पादकांच्या यादीत मुंबईतील   इमॅजिनेरियम रॅपिड कंपनीचा समावेश आहे.

निवडण्यात आलेल्या  कंपन्यांची एकत्रित वार्षिक विक्री उलाढाल आर्थिक वर्ष 2020-21 मधील  88 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये  319 कोटी रुपये  झाली आहे.

ड्रोन आणि ड्रोनच्या सुट्या भागांसाठी पीएलआय  योजनेच्या पात्रता निकषांमध्ये ड्रोन कंपन्यांसाठी 2 कोटी रुपये आणि ड्रोनच्या सुट्या भागांच्या उत्पादकांसाठी 50 लाखांची वार्षिक विक्री उलाढाल तसेच विक्री उलाढालीच्या 40% पेक्षा अधिक मूल्यवर्धन असणे समाविष्ट आहे.

 

S.Kulkarni /S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 1839687) आगंतुक पटल : 249
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी