सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एडीआयपी योजने अंतर्गत दिव्यांगजनांना मदत आणि सहाय्यक उपकरणांच्या वितरणासाठी ‘सामाजिक अधिकारिता शिविर’
Posted On:
06 JUL 2022 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2022
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभाग अलिम्को आणि पलामू जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने 'दिव्यांगजनांना' मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यासाठी 8.07.2022 रोजी सकाळी 11:00 वाजता झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील मेदिनीनगर येथील टाऊन हॉल येथे 'सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
विविध श्रेणीतील 115.72 लाख रुपये किमतीची एकूण 1628 मदत आणि सहाय्यक उपकरणे 1014 दिव्यांगजनांना मोफत वितरित केली जाणार आहेत. , अलिम्कोने यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पलामू जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित केलेल्या मूल्यांकन शिबिरांमध्ये या दिव्यांगजनांचे मूल्यांकन करण्यात आले होते.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिबिराचे उद्घाटन करतील. पलामू मतदारसंघाचे खासदार विष्णू दयाल राम, खासदार सुनील कुमार सिंग आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
कार्यक्रमादरम्यान अलिमको आणि पलामू जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाची लिंक खाली दिली आहे:-
https://youtu.be/bkDBu0idHuE
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839577)
Visitor Counter : 168