वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना सकारात्मक यश; गेल्या तीन वर्षांत भारतात खेळण्यांची आयात 70 टक्क्यांनी कमी तर निर्यातीत 61 टक्क्यांची वाढ


पंतप्रधानांच्या आवाहनानंतर खेळण्यांच्या क्षेत्रात केंद्र सरकारने राबवलेल्या उपक्रमांमुळे खेळणी उद्योगाला मोठा हातभार: अनिल अग्रवाल, अतिरिक्त सचिव, डीपीआयआयटी

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या खेळण्यांचे 96 प्रदर्शकांनी मांडले आकर्षक प्रदर्शन

Posted On: 05 JUL 2022 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जुलै 2022

 

गेल्या तीन वर्षांत, भारतात खेळण्यांची आयात 70 टक्क्यांनी कमी झाली आहे, तर याच काळात, निर्यातीत 61.38% टक्क्यांची वाढ झाली आहे.

नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे 2 ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या बिझनेस टू बिझनेस आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रसारमाध्यमांशी बोलतांना, डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2020 च्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारतातील खेळणी उद्योगांना पुनरुज्जीवन देण्याचे आवाहन केले होते होते, तसेच, मुलांसाठी योग्य अशा प्रकारच्या खेळण्यांची उपलब्धता वाढवावी असा सल्लाही दिला होता. खेळण्यांचा वापर शिक्षणाचे साधन म्हणून करणे, भारतीय मूल्यांवर, इतिहासावर आणि संस्कृतीवर आधारित खेळणी तयार करणे तसेच खेळण्याच्या क्षेत्रात भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवावे यावर पंतप्रधानांनी भर दिला होता. त्यानंतर या क्षेत्रात सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांचा खेळणी उद्योगांना मोठा लाभ झाला, त्याचे परिणाम म्हणूनच आपल्याला आज मेक इन इंडिया अंतर्गत खेळणी उत्पादन उपक्रम यशस्वी होतांना दिसतो आहे. आता आपण केवळ, खेळण्यांसाठी लागणाऱ्या काही वस्तूंचीच आयात करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व 96 प्रदर्शकांनी पारंपरिक खेळणी, बांधकाम शिकवणारी खेळणी, बाहुल्या, बिल्डिंग ब्लॉक खेळणी, बोर्ड गेम्स, कोडी, इलेक्ट्रॉनिक खेळणी, शैक्षणिक खेळणी, राइड-ऑन इत्यादींपासून विविध श्रेणीतल्या उत्पादनांचे प्रदर्शन केले होते. विशेष म्हणजे ही सर्व खेळणी भारतात तयार झालेली होती. भारतात लघु आणि मध्यम तसेच मोठ्या उद्योगांनी खेळणी तयार केली आहेत. चेन्नापटना, वाराणसी इथली,  जीआय टॅग असलेली खेळणी देखील प्रदर्शित केली गेली होती.

भारतीय विचार आणि मूल्यांवर आधारित तसेच, ‘वोकल फॉर लोकल’ ला प्रोत्साहन देणारी खेळणी देखील या प्रदर्शनात  उपलब्ध होती. या थीमला मान्यता दिली आहे. प्रत्येक खेळण्यांच्या श्रेणीमध्ये परवडणारी आणि उत्तम दर्जाची महागडी खेळणी देखील आहेत. 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या प्रदर्शनापेक्षा यंदाचे प्रदर्शन अनेक अर्थांनी वेगळे होते.  यातील 116 स्टॉल्सपैकी 90 स्टॉल्समध्ये केवळ आयात केलेली खेळणी प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला भारतातील 3,000 हून अधिक प्रतिनिधी तसेच  सौदी अरेबिया, UAE, भूतान, USA इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय खरेदीदारांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. 

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1839433) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi