संरक्षण मंत्रालय

एलएएच आयएनएस 324 विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू

Posted On: 04 JUL 2022 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2022

 

आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे 04 जुलै 22 रोजी  आयोजित एका शानदार समारंभात पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, एव्हीएसएम , वायएसएम , व्हीएसएम  व्हाइस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांच्या उपस्थितीत ,  आयएनएएस 324  विमान भारतीय नौदलात दाखल झाले. स्वदेशी रचना असलेले आणि एमके  III (एममार) प्रगत हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे (एएलएच) परिचालन करणारे हे पूर्व किनाऱ्यावर तैनात पहिले पथक आहे.

एएलएच एमके III या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत ज्यात  देखरेख  ठेवणारे आधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर यांचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने  (एचएएल)  ही वजनाने  हलकी हेलिकॉप्टर्स  विकसित केली असून त्यांची निर्मितीही केली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या   आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने,या हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. एमआर  आणि एसएआर   हे हेलिकॉप्टर  त्यांच्या मुख्य भूमिकांव्यतिरिक्त, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण  मोहिमा  तसेच मरीन कमांडोसह विशेष मोहिमांसाठी  देखील तैनात केले जाऊ शकतात.

हेलिकॉप्टरमध्ये गंभीर आजारी रूग्णांच्या वैद्यकीय स्थलांतराची सोय करण्यासाठी एअर म्ब्युलन्सच्या रूपात वापरण्यासाठी एअरबोर्न मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एमआयसीयु ) देखील आहे.पूर्व नौदल  कमांडमध्ये पहिल्या एएलएच  एमके  III तुकडीची  नियुक्ती केल्याने पूर्व किनाऱ्यावर देखरेख ठेवण्याची क्षमता वाढेल, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना, व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांनी सांगितले.

 

 

 

 

S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 



(Release ID: 1839135) Visitor Counter : 172