संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल), भानूर येथील नवीन उत्पादन सुविधांचे राष्ट्रार्पण
या सुविधांना ‘आत्मनिर्भर भारत’ करण्याच्या मार्गावरील मैलाचे दगड म्हणून ओळखले जाईल. आपले सशस्त्र दल मजबूत ,आधुनिक आणि जागतिक दर्जाचे बनवण्याला प्राधान्य आहे; अग्निपथ ही युवा वर्ग आणि देशाच्या हिताची क्रांतिकारी सुधारणा आहे: संरक्षणमंत्री
Posted On:
02 JUL 2022 5:02PM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जुलै 2022 रोजी तेलंगणातील भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) च्या भानूर युनिटला भेट दिली आणि सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम (डीपीएसयु) द्वारे निर्माण केलेल्या अनेक नवीन उत्पादन सुविधा राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये भानूर युनिटमध्ये वॉरहेड सुविधा आणि कांचनबाग युनिटमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) साधक सुविधा यांचा समावेश आहे.
बीडीएलचे संशोधक, अभियंता, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना संबोधित करताना रक्षा मंत्री यांनी या उत्पादन सुविधांच्या उद्घाटनाचा दाखला देत असे सांगितले की, यातून संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला साकार करण्यासाठी डीपीएसयुची वचनबद्धता दिसून येते.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ व्हिजनच्या अनुषंगाने आणि परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने स्वदेशी उत्पादनांची निर्मिती करून स्वावलंबनाकडे सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्याबद्दल त्यांनी बीडीएलचे कौतुक केले.
पुढील पाच वर्षांसाठी स्वदेशी योजना तयार केल्याबद्दल आणि पहिल्या दोन वर्षांचे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य केल्याबद्दल त्यांनी कंपनीचे अभिनंदन केले. रक्षा मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेले केंद्र आरएफ सीकर सुविधा, आरएफ सीकरचे उत्पादन आणि त्याच्या चाचणीसाठी एक एकीकृत केंद्र आहे.
सीकर ही एक बहुआयामी आणि तंत्रज्ञान-केंद्रित उपप्रणाली आहे जी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भविष्यातील सर्व क्षेपणास्त्रांमध्ये वापरली जाईल. 50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ही सुविधा बीडीएलने उभारली आहे. ज्यामध्ये सीकर तयार करण्याची क्षमता आहे. अशा जगभरातील काही निवडक कंपन्यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी बीडीएलचे अभिनंदन केले. ही सुविधा क्षेपणास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात 'आत्मनिर्भरता' साध्य करण्यासाठी मोठी भूमिका बजावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राजनाथ सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की,येथील वॉरहेड सुविधेमुळे भविष्यातील वॉरहेड्स निर्मितीच्या व्याप्तीमध्ये विविधता येईल आणि भारताला या क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल. या सुविधेचे उद्घाटन करून, बीडीएलने स्वावलंबनाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे,कारण या सुविधेचा वापर सध्याच्या तसेच भविष्यकालीन क्षेपणास्त्रांसाठी केला जाणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी आणि सुधारणा आणण्यासाठी सरकारच्या अटल वचनबद्धतेचा उच्च्चार करत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, "सशस्त्र दलांना जलद ,मजबूत,आधुनिक आणि जागतिक दर्जाची संरक्षण सेवा बनवणे हे आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. ".देशाच्या, सशस्त्र दलाच्या आणि तरुणांच्या हिताची क्रांतिकारी सुधारणा असे अग्निपथ योजनेचे वर्णन त्यांनी केले. “आम्ही अनेक देशांच्या संरक्षण प्रणालींचा अभ्यास करून त्यांच्या निष्कर्षांची सांगड आपल्या येथील प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या परिस्थितीशी घालून या योजनेस अंतिम रूप दिले. भारतीय वायुसेनेला, अग्निपथ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर सेवांमध्येही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. आपल्या तरुणांनी पुढे येऊन देशसेवेच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838830)
Visitor Counter : 331