अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीएसटी @5 देशाच्या सर्वांगीण विकासाचे साधन या दृष्टीकोनासह पाचवा जीएसटी दिवस नवी दिल्ली येथे साजरा


जीएसटी अंमलकबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी

Posted On: 01 JUL 2022 9:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

जीएसटी @5 देशाच्या सर्वांगीण विकासाचे साधन या  दृष्टीकोनातून भारत सरकारने आज 5वा जीएसटी दिवस साजरा केला.केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या आणि वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी हे सन्माननीय अतिथी होते. वित्त मंत्रालय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित यावेळी  होते.

Picture 1  Picture 7

तांत्रिक असो किंवा महामारी या पाच वर्षांत जीएसटीने प्रत्येक संभाव्य आव्हानाच्या कसोटीवर मात केली आहे, असे यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.स्वयंचालनामध्ये आवश्यक असलेल्या संभाव्य बदलांबाबत व्यापार क्षेत्राकडून  येणाऱ्या  सतत सूचनांना स्वीकार केल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. जीएसटीच्या अंमलबजावणीशी संबंधित पाच विषयांवर आणि काळाची गरज पूर्ण करण्यासाठी वेळेवर सुधारणा कशा झाल्या यासंदर्भात सादरीकरण केल्याबद्दल सीतारामन यांनी व्यापार क्षेत्रातील  पाच प्रतिनिधींचे आभार मानले , 2017 पासून जीएसटीच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी कठोर परिश्रम करणाऱ्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळातील  अधिकाऱ्यांचे अर्थमंत्र्यांनी कौतुक केले.सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे जीएसटी संकलन उत्साहवर्धक आणि सातत्यपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.  

Picture 17  Picture 13

विशेषत: अनेक कर संपुष्टात आणणे  आणि एक देश एक कर ही संकल्पना लागू करणे यासह जीएसटीची  ठळक वैशिष्ट्य अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी अधोरेखित केली.

या कार्यक्रमात, एक कर, एक बाजार@5 हा  जीएसटीवरील चित्रपट प्रदर्शित करून अप्रत्यक्ष करप्रणाली सुव्यवस्थित करण्यासाठी आणि अनुपालन ओझे कमी करण्यासाठी गेल्या 5 वर्षात केलेले प्रयत्न दाखवण्यात आले. 

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838731) Visitor Counter : 216


Read this release in: Hindi , English , Urdu , Manipuri