वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खुल्या ई वाणिज्य जाळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कृषी क्षेत्रावर तीन दिवसीय "ग्रँड हॅकेथॉन" चे केले उद्घाटन


ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स अर्थात ओएनडीसी ई वाणिज्य परिसंस्थेचे लोकशाहीकरण करेल : केंद्रीय मंत्री पियुष गोयल


विशेषतः कृषी उत्पादक संस्था, मंडई, प्रक्रिया करणारे, निर्यातदार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायिक आणि छोटे किरकोळ विक्रेते यांची संपूर्ण कृषी मूल्य साखळी ओएनडीसी ई कॉमर्सवर उपलब्ध करून देईल : केंद्रीय मंत्री पियुष गोयल

ओएनडीसी लहान विक्रेते, व्यापारी आणि शेतकरी यांना समान पातळीवर ई-कॉमर्समध्ये सहभागी होण्यास मदत करेल

ग्राहकांना बहुआयामी पर्याय निवडीसाठी मिळतील, विशिष्ट पुरवठादारांना अनुकूल गैरप्रकारांना समाप्त करेल: केंद्रीय मंत्री पियुष गोयल

ओएनडीसी बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल, ग्राहकांना, विक्रेत्यांना अनेक फायदे मिळवून देईल

Posted On: 01 JUL 2022 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 1 जुलै 2022

 

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) अर्थात ओएनडीसीने  नाबार्ड ऑनलाइन च्या सहकार्याने तीन दिवसीय ग्रॅन्ड हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. मुंबईतील बीएसई इंडियात प्रत्यक्ष होणाऱ्या कार्यक्रमाशी हा कार्यक्रम संलग्न होता.

ओएनडीसी- नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) आयोजित हे ग्रॅन्ड हॅकेथॉन दोन भागात होत आहे. कृषी अनुदान देताना येणारी आव्हाने या विषयावर पहिले तर कृषी क्षेत्रातील संशोधन या विषयावर दुसरे हॅकेथॉन होत आहे. कृषी क्षेत्रात ई कॉमर्सच्या वापराला मदत करण्यासाठीच्या संशोधनावर ही हॅकेथॉन्स प्रकाश टाकतील.

ओएनडीसी-नाबार्ड ग्रँड हॅकेथॉन सुरू होत आहे, आजचा दिवस स्टार्ट-अपसाठी ओएनडीसी सह भागीदारी करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील सर्वात गंभीर आव्हानांवर मात करण्यासाटी नवनवीन उपायांसाठी एक स्प्रिंगबोर्ड म्हणून काम करेल, आज हे एक लहान पाऊल वाटेल पण यामुळे देशभरातील शेतकरी सक्षम होतील, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरात ई-कॉमर्सच्या कार्यपद्धतीसाठी कदाचित ओएनडीसी मोठे परिवर्तन आणेल असे प्रारंभिक संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

मला आशा आहे की, हे मॉडेल आत्मनिर्भर भारताच्या कथेत परिवर्तित करू शकेल. अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणारा भारत पुढील 25 वर्षे, जसजसे आपण पुढे जाऊ शंभर वर्षांकडे तसे एक समृद्ध राष्ट्र बनत आहे असे गोयल पुढे म्हणाले.

शेतकरी कल्याण आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, जितके जास्त आम्ही  शेतीच्या उत्पादनांविषयी सखोल विचार करू तितके शेतकर्‍यांशी जोडले जाऊ आणि त्यांना सक्षम करू, तंत्रज्ञान आणि नवकल्पना वापरून वेगवान आर्थिक वाढ पाहण्यास सक्षम होऊ, असे त्यांनी सांगितले.

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स अर्थात ओएनडीसी ई वाणिज्य परिसंस्थेचे लोकशाहीकरण करेल. विशेषतः कृषी उत्पादक संस्था, मंडई, प्रक्रिया करणारे, निर्यातदार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायिक आणि छोटे किरकोळ विक्रेते यांची संपूर्ण कृषी मूल्य साखळी ओएनडीसी ई कॉमर्सवर उपलब्ध करून देईल.  लोकशाहीकरण आणि कृषी क्षेत्राचे डिजिटल परिवर्तन याची ग्वाही देण्यासाठी ओएनडीसी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ग्राहकांना बहुआयामी पर्याय निवडीसाठी मिळतील, विशिष्ट पुरवठादारांना अनुकूल गैरप्रकारांना समाप्त करेल असे गोयल म्हणाले.

ओएनडीसी बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल, ग्राहकांना, विक्रेत्यांना अनेक फायदे मिळवून देईल असेही त्यांनी नमूद केले. ओएनडीसी लघु विक्रेते, व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठे विक्रेते, व्यापारी आणि शेतकऱ्यांइतकीच समान संधी बाजारात मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नाबार्ड- ओएनडीसी ग्रॅन्ड हॅकेथॉन ओएनडीसी हा अशा प्रकारचा केंद्र सरकारच्या संकल्पनेतून साकारलेला पहिलाच बाजाराभिमुख उपक्रम आहे.  त्यामुळे लहान विक्रेते, व्यापारी आणि शेतकऱ्यांना  मोठे विक्रेते, व्यापारी आणि शेतकऱ्यांप्रमाणे बाजारपेठेत सहभागी होता येते.

ओएनडीसी सर्व अडथळ्यांवर आणि मर्यादांवर मात करेल तसेच सर्वांना संशोधनाची फळे चाखायला मदत करेल. ओएनडीसीने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कार्यक्षमता तयार केली आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या पर्यायाची निवड करायला मदत होते. ओएनडीसी बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल, असे ते म्हणाले.

अल्गोरिदम सारखे मोठ्या पातळीवर चालणारे गैरव्यवहार जे ग्राहकांना काही गोष्टींसाठी अक्षरशः सक्ती करतात त्याला आळा घालेल.

मॉम-एन-पॉप स्टोअर्स, लहान किरकोळ दुकाने वाचविण्यात मदत करेल, ज्यामुळे आपल्या कोट्यवधी बंधू-भगिनींची उपजीविका वाचवायला मदत होईल असे मंत्री म्हणाले. कोणतेही प्लॅटफॉर्म ओएनडीसी द्वारे एकमेकांशी जोडलेल्या सर्व प्लॅटफॉर्मवर कोणत्याही खरेदीदाराला सेवा देण्यास सक्षम असेल केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी ओएनडीसी ला केलेली सूचना स्थानिक भाषा आणि प्रादेशिक भाषात उपलब्ध असेल जेणेकरून अधिकाधिक लोक डिजिटल ई-च्या सेवांचा आरामात वापर करू शकतील असे त्यांनी सांगितले.

"ग्रँड हॅकेथॉन" मध्ये 700 सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचा भर कृषी क्षेत्रावर आहे, कृषी डोमेनच्या गरजा सोडवणे त्‍याच्‍या अनपेक्षित क्षमतेचा उपयोग करण्‍यात मदत करेल आणि शेतकरी समुदायाला आणि कृषी परिसंस्थेला फायदा होईल.

राज्य सरकारांना त्यांच्या स्थानिक कृषी उत्पादनांचा राष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल.

उद्घाटनाला उपस्थित मान्यवरांमध्ये नाबार्डचे अध्यक्ष डॉ. जी.आर. चिंताला, एमडी आणि ओएनडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
टी. कोशी आणि डीपीआयआयटीचे अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांचा समावेश होता.

फ्लॅगशिप इव्हेंटला स्टार्ट-अप इंडिया अटल इनोव्हेशन मिशन, बेकन प्रथिनेसारख्या अनेक श्रेयप्राप्त राष्ट्रीय उपक्रम/संस्थांचे समर्थन आहे, नाबार्ड ही अग्रणी संस्था म्हणून सर्वत्र ओळखली जाते. सशक्त आणि आर्थिक दृष्ट्या सर्वसमावेशक ग्रामीण भारताला चालना देण्यासाठी त्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. त्याचप्रमाणे, AIM सह स्टार्ट-अप इंडियाने वाढीव सहभाग सुनिश्चित करण्यासाठी इव्हेंटच्या जाहिरातीसाठी मदत केली.

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838713) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi