कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी जनतेच्या समस्यांवर सहजसोपे उपाय आणि अधिक उत्तम परिणाम मिळवून देण्यासाठी “संपूर्णतः सरकारी दृष्टीकोना”सह काम करण्याची संस्कृती विकसित करण्याचे आवाहन सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित 48व्या प्रगत व्यावसायिक कार्यक्रमातील (एपीपीपीए) सहभागींना केले
Posted On:
01 JUL 2022 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2022
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन,अणुउर्जा आणि अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज एपीपीपीए अर्थात सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित 48व्या प्रगत व्यावसायिक कार्यक्रमातील सहभागींना जनतेच्या समस्यांवर सहजसोपे उपाय आणि अधिक उत्तम परिणाम मिळवून देण्यासाठी “संपूर्णतः सरकारी दृष्टीकोना”सह काम करण्याची संस्कृती विकसित करण्याचे आवाहन केले.

10 महिने कालावधीच्या एपीपीपीए अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आत्मनिर्भर भारत तसेच कर्मयोगी अभियानासह इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांचा त्यात समावेश करण्यात आल्याबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी समाधान व्यक्त केले. कोशात राहून काम करण्याचा काळ आता संपला असून सरकारची मंत्रालये आणि विभाग यांच्यात उत्तम समन्वय आणि संयोग निर्माण करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना विविध सामाजिक-आर्थिक योजनांची अधिक उत्तम समज येण्यास आणि चांगल्या उपक्रमांची प्रशंसा करण्यास मदत होईल.

केंद्र सरकारी विभागांमधील सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांच्या एकगठ्ठा बढत्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे अशी घोषणा त्यांनी केली.
संरक्षण दले आणि नागरी सेवेतील एकूण 37 अधिकारी या10 महिने कालावधीच्या 48 व्या एपीपीपीए कार्यक्रमात सहभागी झाले असून हा कार्यक्रम 28 एप्रिल 2023 पर्यंत चालणार आहे.

* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838679)
अभ्यागत कक्ष : 207