अर्थ मंत्रालय
कच्च्या तेलावर प्रतिटन रु. 23,250 चा अधिभार लागू; खनिज तेलाच्या आयातीला हा अधिभार लागू होणार नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर अनुक्रमे प्रतिलीटर रु 6 आणि प्रतिलीटर रु. 13 या दराने विशेष अतिरिक्त अबकारी कर/ अधिभार लागू
एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या (विमान इंधन) निर्यातीवर प्रतिलीटर रु. 6 विशेष अतिरिक्त अबकारी कर (SAED) लागू
वरील पावलांमुळे देशांतर्गत इंधनाच्या दरांवर कोणताही परिणाम होणार नाही
सोन्यावरील सीमाशुल्कात वाढ करून ते 10.75% वरून 15% करण्यात आले; चालू खात्यातील वित्तीय तूट रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले.
30 जून 2022 रोजी अधिसूचना जारी
Posted On:
01 JUL 2022 11:41AM by PIB Mumbai
30 जून 2022 रोजी सीमाशुल्कासंदर्भात लागू करण्यात आलेल्या अधिसूचनांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत. हे तपशील पुढीलप्रमाणे आहेतः
I सोन्यावरील सीमाशुल्कात वाढ
सोन्यावरील सीमाशुल्कात वाढ करून ते 10.75% वरून 15% करण्यात आले आहे.
मे महिन्यामध्ये सोन्याच्या आयातीमध्ये अचानक वाढ झाली असून एकूण 107 टन सोन्याची आयात करण्यात आली आणि जूनमध्येही आयातीचे प्रमाण लक्षणीय आहे. आयातीमध्ये झालेल्या या वाढीमुळे चालू खात्यातील वित्तीय तुटीवर परिणाम होऊ लागला आहे.
II पेट्रोलियम, कच्चे तेल, एचएसडी, पेट्रोल आणि एटीएफ वरील शुल्क/अधिभार
A. पेट्रोलियम क्रूड
कच्च्या तेलावर प्रतिटन रु. 23,250 (विशेष अतिरिक्त अबकारी कर SAED च्या रुपाने) अधिभार लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. स्थानिक कच्चे तेल उत्पादक स्थानिक रिफायनरींना आंतरराष्ट्रीय स्तराच्या अनुसार कच्च्या तेलाची विक्री करत आहेत. त्यामुळे स्थानिक कच्चे तेल उत्पादकांना अतिशय मोठ्या प्रमाणात नफा होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दरांच्या स्तरावर स्थानिक उत्पादकांकडून कच्च्या तेलाची विक्री केली जात आहे.
तसेच या आधीच्या आर्थिक वर्षात 2 दशलक्ष बॅरलपेक्षा कमी वार्षिक उत्पादन असलेल्या लहान उत्पादकांना या अधिभारातून वगळण्यात येईल.
त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या अतिरिक्त उत्पादनाबद्दल प्रोत्साहन म्हणून गेल्या वर्षी कच्चे तेल उत्पादकांनी घेतलेल्या अतिरिक्त उत्पादनावर अधिभार लागू होणार नाही.
वर नमूद केल्याप्रमाणे या उपायांचा पेट्रोलियम उत्पादने आणि इंधनाच्या दरांवर कोणताही परिणाम होणार नाही.
B. एचएसडी आणि पेट्रोल
पेट्रोल आणि डिझेल च्या निर्यातीवर अनुक्रमे प्रतिलीटर रु 6 आणि प्रतिलीटर रु. 13 या दराने विशेष अतिरिक्त अबकारी कर/ अधिभार लागू करण्यात आला आहे.
देशातून डिझेल आणि पेट्रोलच्या कोणत्याही प्रकारच्या निर्यातीवर हे अधिभार लागू होतील.
वरील उपाययोजना निर्यातीवर लागू होत असल्याने त्यांचा स्थानिक बाजारातील हाय स्पीड डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही.
त्याच वेळी डीजीएफटीने निर्यातदारांसाठी एक निर्यात धोरण अट घालून दिली आहे. त्यानुसार निर्यातदारांना निर्यातीच्या बिलात जितक्या प्रमाणाचा उल्लेख केला आहे त्याच्या 50% प्रमाणाइतक्या उत्पादनाचा पुरवठा चालू आर्थिक वर्षात स्थानिक बाजारात केला जाईल, असे निर्यातीच्या वेळी जाहीर करण्याची आवश्यकता आहे.
C. एव्हिएशन टर्बाईन फ्युएल
एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या (विमान इंधन) निर्यातीवर प्रतिलीटर रु. 6 विशेष अतिरिक्त अबकारी कर (SAED) लागू करण्यात आला आहे.
देशांतर्गत विमान प्रवासाच्या दरावर या उपायाचा कोणताही परिणाम होणार नाही.
***
S.Tupe/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838496)
Visitor Counter : 278