संरक्षण मंत्रालय
संरक्षण दलातील निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची विनंती
Posted On:
30 JUN 2022 8:31PM by PIB Mumbai
संरक्षण दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक निवृत्तीवेतन अखंडितपणे आणि वेळेवर मिळण्यासाठी हयातीचा दाखला सादर करणे ही वैधानिक गरज आहे. मात्र, 30 जून 2022 रोजी हाती आलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की, स्पर्श या संरक्षण दलांसाठी असलेल्या निवृत्तीवेतन प्रशासन यंत्रणेमध्ये स्थलांतरित झालेल्या 22,939 निवृत्तीवेतन धारकांनी अजूनही त्यांचा हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
तसेच, वारसा हक्काने मिळणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी, (वर्ष 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या आणि स्पर्श योजनेत सहभागी नसलेल्या), जुन्या निवृत्तीवेतन योजनेतील सहभाग कायम ठेवला आहे त्यांच्यापैकी सुमारे 45,000 निवृत्तीवेतन धारकांनी उपलब्ध असलेल्या कोणत्याही मार्गांचा वापर करून अजूनही हयातीचा दाखला प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
संरक्षण दलांतून निवृत्त झालेल्या ज्या निवृत्तीवेतन धारकांनी अजूनही हयातीचा दाखला प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल त्यांना, त्यांचे मासिक निवृत्तीवेतन सुरळीतपणे मिळण्याची सुनिश्चिती व्हावी म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हयातीचा दाखला सादर करण्यासाठी खालील मार्गांचा वापर करता येईल:
1. अंड्रॉईड फोनच्या वापरकर्त्यांसाठी डिजिटल जीवन प्रमाण ऑनलाईन अथवा जीवन प्रमाण फेस अॅप द्वारे.
a. यासाठी खालील लिंकचा वापर करून हे अॅप फोनमध्ये डाऊनलोड करण्याची तसेच वापरण्याची माहिती मिळविता येईल. https://jeevanpramaan.gov.in/package/documentdowload/JeevanPramaan_FaceApp_3.6_Installation
b. स्पर्श निवृत्तीवेतन धारक : कृपया “ Defence – PCDA (P) Allahabad” हे मंजुरी प्राधिकरण आणि “SPARSH – PCDA (Pensions) Allahabad हे वितरण प्राधिकरण म्हणून निवडा.
c. वारसाहक्काद्वारे निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्ती (वर्ष 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या): कृपया “Defence – Jt.CDA(AF) Subroto Park” किंवा Defence – PCDA (P) Allahabad” किंवा “Defence – PCDA (Navy) Mumbai हे मंजुरी प्राधिकरण आणि तुमचे निवृत्तीवेतन वितरीत करणारी संबंधित बँक हे वितरण प्राधिकरण म्हणून निवडा.
2. निवृत्तीवेतन धारकांना सामायिक सेवा केंद्रांना भेट देऊन देखील ही वार्षिक हयातीचा दाखला ओळखनिश्चिती क्रिया पूर्ण करता येईल. तुमच्या परिसरातील सामायिक सेवा केंद्र शोधण्यासाठी कृपया येथे क्लिक करा: https://findmycsc.nic.in/
3. निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या जवळच्या डीपीडीओ कार्यालयाला भेट देऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. वारसाहक्काद्वारे निवृत्तीवेतन मिळणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या बँकेमध्ये जाऊन त्यांचा जीविताचा दाखला अद्ययावत करता येईल.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838332)
Visitor Counter : 145