PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 29 JUN 2022 5:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 29 जून 2022

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 197.46 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 99,602
  • Active cases stand at 0.23%
  • Recovery Rate currently at 98.56%
  • 11,574 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,28,08,666
  • 14,506 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (3.35%)
  • Weekly Positivity Rate (3.30%)
  • 86.19 cr Total Tests conducted so far; 4,33,659 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                             #IndiaFightsCorona

 

Press Information Bureau

Ministry of Information & Broadcasting

Government of India

*****  

 

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 197.46 (1,97,46,57,138) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,56,78,429 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.65 (3,65,66,839) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या 99,602 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.23% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.56% आहे.गेल्या 24 तासांत 11,574 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,28,08,666 झाली आहे.

गेल्या 24 तासात 14,506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,33,659 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.19 (86,19,23,059) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.35% आहे.

 

इतर अपडेटस्

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

***

N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838059) Visitor Counter : 138