दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डाक कर्मयोगी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज केला आरंभ
‘डाक कर्मयोगी’ पोर्टल सुमारे 4 लाख ग्रामीण डाक सेवक आणि विभागीय कर्मचाऱ्यांची क्षमता उंचावणार
Posted On:
28 JUN 2022 8:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
'डाक कर्मयोगी', या टपाल विभागाच्या ई-लर्निंग पोर्टलचा प्रारंभ आज दिनांक 28-06-2022 रोजी केंद्रीय दळणवळण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आणि केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान, यांच्या हस्ते, इंडियन हॅबिटॅट सेंटर मधील स्टीन सभागृहात करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि किमान सरकार' आणि 'कमाल प्रशासन' या संकल्पनेसह नोकरशाहीच्या कार्यक्षमतेमध्ये 'उचित परिवर्तन' आणण्याच्या उद्देशाने आणलेल्या 'मिशन कर्मयोगी' चा दृष्टीकोन समोर ठेवून हे पोर्टल टपाल खात्यांतर्गत 'इन-हाउस' विकसित केले गेले आहे.

'डाक कर्मयोगी' पोर्टल सुमारे 4 लाख ग्रामीण डाक सेवक आणि विभागीय कर्मचार्यांची क्षमता वाढवेल आणि प्रशिक्षणार्थींना एकसमान प्रमाणित प्रशिक्षण सामग्री ऑनलाइन किंवा मिश्रित पध्दतीने प्रत्यक्षपणे प्रवेश करण्यास सक्षम करून त्यांना ग्राहकांना विविध प्रकारच्या शासन ते ग्राहक (G2C) सेवा प्रभावीपणे वितरित करण्यास सक्षम करेल.नेमून दिलेले कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थीच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर स्वयंचलित प्रणालीद्वारे तयार केलेले अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाठवले जाईल. प्रशिक्षणार्थी प्रत्येक व्हिडिओ आणि इतर शिक्षण सामग्रीसाठी त्यांचा अभिप्राय, श्रेणी आणि सूचना देऊ शकतात जेणेकरुन आवश्यक सुधारणा करणे सुनिश्चित करता येईल.

या पोर्टलला सुरुवात झाल्यामुळे, विभागीय कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवक त्यांच्या सोयीनुसार ‘कधीही, कुठेही’ प्रशिक्षण घेऊ शकतील आणि त्यांची वृत्ती, कौशल्य आणि ज्ञान (A,S,K)यांच्या श्रेणीत सुधारणा करू शकतील.कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवकांची श्रेणीसुधारित करून उत्तम सेवा प्रदान करण्यात त्यांना सक्षम करण्यासाठी पोर्टल मधे येत्या काही काळात अनेक सुधारणा होत जातील,अशी अपेक्षा आहे.
टपाल खात्यातील कर्मचार्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या कामाचा दर्जा टिकवणे किंवा सुधारणे यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी, अश्विनी वैष्णव, आणि देवूसिंह चौहान यांच्या हस्ते आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कर्मचाऱ्यांना मेघदूत पुरस्कार या कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र आणि रोख रु. 21000/-प्रदान करण्यात आले.
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837707)