शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या अध्ययनाचा समावेश, शैक्षणिक अभ्यासक्रमात केला जावा- केंद्रीय शिक्षण सचिवांची सूचना
“उपग्रह दूरसंवाद, भू-माहितीतंत्र आणि भू-अवकाशीय तंत्रज्ञानाचा शहरी नियोजन तसेच बहुपर्यायी लॉजिस्टिक सुविधांसाठी वापर” या विषयावरील चर्चासत्राचे NITIE मुंबईकडून आयोजन
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2022 7:02PM by PIB Mumbai
मुंबई, 28 जून 2022
पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा समावेश, देशातल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात केला जावा, अशी सूचना, केंद्रीय शिक्षण सचिव, के. संजय मूर्ती यांनी केली आहे.
या संदर्भात ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थांनी भारत सरकारच्या या उपक्रमाचे महत्त्व ओळखणे ही काळाची गरज आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जेदार ज्ञान प्रसार आणि लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील संबंधित संशोधनांद्वारे बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची ताकद असते, असेही ते पुढे म्हणाले. “उपग्रह दूरसंवाद, भू-माहितीतंत्र आणि भू-अवकाशीय तंत्रज्ञानाचा शहरी नियोजन तसेच बहुपर्यायी लॉजिस्टिक सुविधांसाठी वापर” आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था- NITIE मुंबई ने शिक्षण मंत्रालय आणि भास्कराचार्य राष्ट्रीय अवकाश उपयोग आणि भू-माहिती तंत्रज्ञान (BISAG-N) संस्थेच्या सहकार्याने ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
हिमाचल प्रदेशात धरमशाला इथे गेल्या आठवड्यात झालेल्या मुख्य सचिवांच्या परिषदेचा संदर्भ देत, के. संजय मूर्ती यांनी सांगितले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारांनी त्यांची कार्यक्षमता आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गतिशक्ती व्यासपीठाच्या क्षमतांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. उद्योग व्यवसाय तसेच पायाभूत क्षेत्रात देखील गतिशक्ती योजनेवर चर्चा होत असते, असेही ते पुढे म्हणाले.
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी मुंबई संस्थेने, संचालक प्रा एम के तिवारी यांच्या नेतृत्वाखाली लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे के. संजय मूर्ती यांनी यावेळी कौतुक केले. इतर प्रमुख संस्थांनी देखील असे करावे, अशी सूचना त्यांनी केली. त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी एआयसीटीईने विविध विषयांसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणावा, असा सल्ला त्यांनी दिला. उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई हे लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनाशी संबंधित क्षमता वाढीसाठी नोडल केंद्र म्हणून ओळखले जाते.
BISAG N, चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंग यांनी जिओ/स्थानिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापरावर मल्टीमोडल वाहतुकीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी तपशीलवार सादरीकरण केले.
एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. पुनिया यांनी या क्षेत्रातील प्राध्यापकांची क्षमता वाढवण्यावर भर दिला.

कार्यशाळेत पुढील काही कृती बिंदूंवर चर्चा करण्यात आली:
- शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी योगदान द्यायला हवे.
- शैक्षणिक संस्थांना BISAG N ने विकसित केलेल्या मंचाचा वापर करण्यासाठी आणि संशोधन कार्य, प्रकल्प, प्रशिक्षण इत्यादी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पायाभूत सुविधांच्या विकासासह विविध वापरांसाठीचे व्यासपीठ मजबूत करण्यासाठी ह्या मंचाचा वापर करता येईल.
- लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीचे जाळे निर्माण करण्यासाठीच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि पीएम गति शक्ती मिशनसाठीच्या आवश्यकता बरोबरीने राखण्याच्या दृष्टीने कार्यक्षमता आणि व्यावहारिक समन्वय निर्माण व्हावा, आणि त्यांचे योग्य एकीकरण व्हावे, यासाठी समन्वय.
- शैक्षणिक संस्थांनी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांद्वारे लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यावर आणि विविध विभागांमधील तुकड्यातुकड्यांमध्ये काम करण्याची पद्धत काढून टाकण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान एकत्रित करण्यावर भर दिला.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी केले. त्यांनी पंतप्रधान गति शक्ती बृहद आराखड्याची प्रासंगिकता आणि व्याप्ती स्पष्ट केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या माध्यमातून पंतप्रधान गति शक्ती योजनेला चालना देण्यासाठी व्यापक रूपरेषा देखील त्यांनी सांगितली.
पीएम गति शक्ती योजनेंतर्गत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित या कार्यशाळेत आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि सीएफटीआयएसचे अनेक नामवंत संचालक उपस्थित होते. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेच्या प्रा. सीमा उन्नीकृष्णन यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यशाळेची सुरुवात झाली.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837685)
आगंतुक पटल : 306