PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 28 JUN 2022 6:00PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

 

  • 197.31 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 96,700
  • Active cases stand at 0.22%
  • Recovery Rate currently at 98.57%
  • 9,486 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,27,97,092
  • 11,793 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (2.49%)
  • Weekly Positivity Rate (3.36%)
  • 86.14 cr Total Tests conducted so far; 4,73,717 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 28 जून 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 197.31 कोटीहून अधिक (1,97,31,43,196)  पर्यंत पोहचली आहे. 2,56,30,111 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य करण्यात आले आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 पासून कोविड19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत 3.64 कोटी (3,64,58,204)  हून अधिक पौगंडावस्थेतील मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील लोकांना  कोविड-19 खबरदारीचा डोस देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 96,700 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.22% इतकी आहे. परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण बरे होण्याचा दर 98.57% इतका आहे. गेल्या 24 तासात,  9,486 रूग्णबरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून)  4,27,97,092 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत 11,793 नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली.

गेल्या 24 तासात,  एकूण 4,73,717  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 86.14  कोटी (86,14,89,400) इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्याच्या घडीला 3.36%  इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.49% असल्याची नोंद झाली आहे.

 

इतर अपडेट्स :

 

* * *

N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837657) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri