वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंसाठीच्या (व्हाईट गुड्स- वातानुकूलित यंत्रे आणि एलईडी दिवे) पीएलआय अर्थात उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेच्या दुसऱ्या फेरीत 1,368 कोटी रुपयांच्या प्रतिबद्ध गुंतवणुकीसह 15 कंपन्यांची निवड


पुढील 5 वर्षांत या योजनेअंतर्गत 25,583 कोटी रुपयांचे उत्पादन अपेक्षित

सुमारे 4,000 व्यक्तींसाठी अतिरिक्त थेट रोजगार निर्मिती

Posted On: 28 JUN 2022 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022

 

व्हाईट गुड्स (वातानुकूलित यंत्रे आणि एलईडी दिवे) मध्ये पीएलआय योजनेच्या दुसऱ्या फेरीत दुसऱ्या फेरीत प्राप्त झालेल्या 19 अर्जांच्या मूल्यमापनानंतर, 1,368 कोटी रुपयांची प्रतिबद्ध गुंतवणूक असलेले 15 अर्जदार निवडण्यात आले. यामध्ये 908 कोटी रुपयांच्या प्रतिबद्ध गुंतवणुकीसह एसीसाठी लागणाऱ्या भागांच्या निर्मितीसाठी 6  कंपन्याचा तर 460 कोटी रुपयांच्या प्रतिबद्ध गुंतवणूकीसह एलईडी लाइट्सच्या घटकांचे उत्पादन करणाऱ्या 9 कंपन्यांचा समावेश आहे. या 15 कंपन्यांचे पाच वर्षांत 25,583 कोटी रुपयांचे एकूण उत्पादन होईल आणि 4,000 लोकांसाठी अतिरिक्त थेट रोजगार निर्माण होईल.

चार अर्जदारांना तज्ज्ञांच्या समितीकडे (CoE) परीक्षेसाठी आणि त्यांच्या शिफारशींसाठी पाठवले जात आहे. अर्जदारांचे तपशील परिशिष्टात दिलेले आहेत.

पीएलआय योजनेमुळे या विभागांमधील देशांतर्गत मूल्यवर्धन सध्याच्या 15-20% वरून 75-80% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असे आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (DPIIT) अतिरिक्त सचिव अनिल अग्रवाल यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पीएलआय योजना आणि गुणवत्ता नियंत्रण आदेश, मानके आणि लेबलांसह इतर नियामक उपायांनी एसी आणि एलईडीमध्ये मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना मोठी चालना दिली आहे, असेही ते म्हणाले.

पहिल्या फेरीत 52 कंपन्यांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते आणि 5,264 कोटी रुपयांची वचनबद्ध गुंतवणूक असलेल्या 46 अर्जदारांची निवड करण्यात आली होती.

व्हाईट गुड्सवरील पीएलआय योजना ही भारतातील वातानुकूलित यंत्रे आणि एलईडी दिवे उद्योगासाठी संपूर्ण घटक परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 7 एप्रिल 2021 रोजी व्हाईट गुड्स (वातानुकूलित यंत्रे आणि एलईडी दिवे) साठी उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना 6,238 कोटी रुपयांच्या खर्चासह आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत लागू केली जाईल.

Annexure

Table1: Applicants provisionally selected in the 2nd Round of PLI Scheme for White Goods

(i). Air Conditioners

Sl.

Applicant

Products to be manufactured

Gestation period

Committed Investment

(RsCrore)

  1.  

ADANI COPPER TUBES LIMITED

  1. Copper Tube (Plain and/or grooved)

Upto03/23

408.00

  1.  

LG ELECTRONICS INDIA PRIVATE LIMITED

  1. Compressors
  2. Control Assemblies for IDU or ODU or Remotes
  3. Motors
  4. Heat exchangers
  5. Plastic Moulding components

 

Upto03/23

300.00

  1.  

STARION INDIA PVT LTD

1. Control Assemblies for IDU or ODU or Remotes

2. Cross Flow Fan (CFF)

3. Heat exchangers

4. Sheet Metal Components

5. Plastic Moulding components

 

Upto03/23

50.10

  1.  

KAYNES TECHNOLOGY INDIA LIMITED

1. Control Assemblies for IDU or ODU or Remotes

2. Plastic Moulding components

3. Display Panels (LCD/ LED)

Upto03/23

50.00

  1.  

MITSUBISHI ELECTRIC INDIA PRIVATE LIMITED

1. Control Assemblies for IDU or ODU or Remotes

2. Cross Flow Fan (CFF)

3. Heat exchangers

 

Upto03/23

50.00

  1.  

SWAMINATHAN ENTERPRISES PRIVATE LIMITED

  1. Motors

Upto03/23

50.00

Total

 

908.10

 

 (ii) LED Lights

Sl.

Applicant

Products to be manufactured

Gestationperiod

Committed Investment

(RsCrore)

1.

JINDAL POLY FILMS LIMITED

1. Metalized film for capacitors

Upto03/23

360.00

2.

SAHASRA SEMICONDUCTORS PRIVATE LIMITED

11. LED Drivers

Upto03/23

20.00

3.

KONARK FIXTURES LIMITED

1. LED Drivers

2. LED Modules

3. Mechanicals- Housing

4. Diffusers

5. LED Light Management Systems (LMS)

6. Printed Circuit Boards (PCB) including Metal Clad PCBs

7. LED Transformers

 

Upto03/23

16.55

4.

WIPRO ENTERPRISES PRIVATE LIMITED

1. LED Drivers

2. LED Light Management Systems (LMS)

Up to 03/23

12.00

5.

LUMENS AIRCON PRIVATE LIMITED

1. LED Drivers

2. LED Modules

3. Mechanical- Housing

4. Diffusers

Up to 03/23

10.50

6.

SVN OPTO ELECTRONICS PVT LTD

1. LED Drivers

2. LED Engines

3. LED Modules

4. Mechanicals – Housing

5. Diffusers

 

Up to 03/23

10.33

7.

CROMPTON GREAVES CONSUMER ELECTRICALS LIMITED

1. LED Drivers

2. LED Modules

3. Mechanicals- Housing

4. Diffusers

5. LED Light Management Systems (LMS)

6. LED Engines

 

Upto03/23

10.15

8.

ELIN ELECTRONICS LIMITED

1. LED Drivers

2. LED Engines

3. LED Modules

4. Mechanicals – Housing

5. Diffusers

 

Up to 03/23

10.00

9.

ESKO CASTING AND ELECTRONICS PRIVATE LIMITED

1. LED Drivers

2. LED Engines

3. Mechanicals –Housing

4. LED Light Management Systems (LMS)

 

Upto03/23

10.00

Total

 

459.53

 

Table2: Applicants referred to the Committee of Experts (CoE)

 

Sl.

Applicant

Products to be manufactured

Gestation period

Committed Investment

(RsCrore)

1.

ZECO AIRCON LIMITED

1. Heat Exchangers

2. Sheet Metal components

 

Upto03/23

100.00

2.

EMM ESS AIRCON PRIVATE LIMITED

1. Control Assemblies for IDU or ODU or Remotes,

2. Cross Flow Fan (CFF),

3. Valves & Brass components,

4. Sheet Metal components,

5. Plastic Moulding components

 

Upto03/23

52.00

3.

SPEEDOFER INDIA PRIVATE LIMITED

1. Ferrite Cores

Upto03/23

18.00

4.

SIMOCO TELECOMMUNICATIONS (SOUTH ASIA) LIMITED

1. LED Drivers

2. LED Engines

3. LED Modules

4. Wire Wound Inductors

5. Drum Cores

6. LED Light Management Systems (LMS)

7. Printed Circuit Boards (PCB) including Metal Clad PCBs

8. LED Transformers

 

Upto03/23

10.63

Total

 

180.63

 

* * *

S.Thakur/P. Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837598) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil