भूविज्ञान मंत्रालय
उद्यापासून सुरु होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2022 च्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लिस्बन येथे भारतीय प्रतिनिधी आणि दूतावासाच्या अधिकार्यांसह घेतली परिषदपूर्व बैठक
बैठकीसंदर्भात भारताच्या तयारीचा आढावा घेण्यासह विविध मुद्द्यांवर भारतीय शिष्टमंडळाने घेतलेल्या भूमिकेवर झाली चर्चा
Posted On:
26 JUN 2022 8:33PM by PIB Mumbai
उद्यापासून सुरु होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2022 च्या पार्श्वभूमीवर, भारताच्या बाजूने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि बैठकीत उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध मुद्द्यांवर भारतीय शिष्टमंडळाने घेतलेल्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी, या परिषदेसाठी पोर्तुगालमधील लिस्बन येथे पोहोचल्यानंतर लगेचच केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; डॉ जितेंद्र सिंह यांनी आज भारतीय प्रतिनिधी आणि दूतावासाच्या अधिका-यांची परिषदपूर्व बैठक घेतली.
27 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत लिस्बन येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत 130 हून अधिक देश सहभागी होत आहेत.
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या जटील समस्या सोडवण्याचा जग प्रयत्न करत आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जागतिक प्रयत्नांमध्ये पुढाकार घेतला आहे, अशा महत्वाच्या काळात ही महासागर परिषद, केनिया आणि पोर्तुगालच्या सरकारांनी सह-आयोजित केली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
“आपला महासागर वाचवा आणि भविष्याचे रक्षण करा” या जागतिक महासागर विषयक कृतीचा एक नवीन अध्याय सुरू करण्याच्या उद्देशाने अत्यंत आवश्यक असलेले विज्ञान-आधारित अभिनव उपाय भारत मंचावर आणेल , असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.डॉ जितेंद्र सिंह या संयुक्त राष्ट्र परिषदेत ''उद्दिष्ट 14 च्या अंमलबजावणीसाठी विज्ञान आणि नवोन्मेषावर आधारित महासागर कृती कार्यक्रम वाढवणे: आढावा , भागीदारी आणि उपाय'' या संकल्पनेवर मुख्य भाषण देतील.
या परिषदेत भारत चर्चेत सक्रिय सहभाग घेईल आणि सागरी प्रदूषण, शाश्वत महासागर-आधारित अर्थव्यवस्थांना चालना देणे आणि बळकट करणे, सागरी आणि किनारी परिसंस्थांचे व्यवस्थापन, संरक्षण, संवर्धन आणि पुनर्संचयित करणे, महासागरातील आम्लीकरण, डीऑक्सीजनेशन आणि महासागरातील तापमानवाढीचे व्यवस्थापन आणि निराकरण करणे आणि शाश्वत मासेमारी यासारख्या मुद्द्यांवर उपाय सुचवेल, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837169)
Visitor Counter : 162