गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियान- नागरी 2.0- भारताच्या संपूर्ण शहरी प्रदेशांची  उघड्यावरील शौचाच्या पद्धतीपासूनची  मुक्तता जारी  ठेवण्यासाठी सुधारित स्वच्छ प्रमाणित प्रोटोकॉल्स जारी

Posted On: 25 JUN 2022 10:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) स्वच्छ भारत अभियान- नागरी 2.0, राबवत आहे. यात ओडीएफ म्हणजे उघड्यावरील शौचाच्या पद्धती, ओडीएफ प्लस, ओडीएफ प्लस प्लस आणि जल प्रमाणपत्र यासाठी सुधारित स्वच्छ प्रमाणपत्र प्रोटोकॉल्स जारी केले आहेत.  नवी दिल्लीत निर्माण भवन इथे गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयांचे सचिव, मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली, काल  झालेल्या कार्यक्रमात, हे नवे प्रोटोकॉल्स जारी करण्यात आले. राज्ये/केंद्रशासित प्रदेश, विविध शहरे आणि विभागांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, लाल किल्ल्यावरुन केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात, भारतातून, उघड्यावर शौचाला जाण्याच्या पद्धतीचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते, त्यानंतर ह्या अभियानाला  देशाच्या विकासात प्राधान्यस्थानी ठेवण्यात आले होते. अभियान यशस्वी करण्यासाठी, देशातील नागरिकांमध्ये, या विषयाबाबत जनजागृती वाढवली गेली,तसेच दुसरीकडे, सार्वजनिक स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या टप्प्यातच, नागरी भागात उघड्यावर शौचाची पद्धत 100 टक्के बंद करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाले. मात्र, या अभियानाचे व्यापक उद्दिष्ट त्याहीपलीकडचे आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जारी करण्यात आलेले सुधारित प्रोटोकॉल्स या व्यापक उद्दिष्टांशी सुसंगत आहेत तसेच खालील उद्दिष्टे सुनिश्चित करण्याचा याचा उद्देश आहे- 

  • कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी किंवा मैलामिश्रित गाळ पर्यावरणातील जलस्त्रोतात सोडले जाणार नाही. एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वापरले जाणारे सगळे पाणी (सीवरेज आणि सेप्टेज, सांडपाणी आणि कारखान्यातील पाणी यांसह) सुरक्षितपणे स्वच्छ करून, त्यानंतर ते पुढे पाठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल, या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केला जाईल.
  • देशांतील सर्व गावांमध्ये उघड्यावर शौचाची पद्धत पुढेही बंदच राहावी यासाठी या अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांमधील महत्वाचे घटक पुढीलप्रमाणे :
  • ओडीएफ  - नमुना सर्वेक्षण आकार आणि ठिकाणांची संख्या वाढवून, एक उत्तम देखरेख व्यवस्था असेल हे सुनिश्चित केली जाईल.  
  • ओडीएफ + - सीटी/पीटी च्या कार्यपद्धतीवर भर आणि  त्यांचे कार्य दीर्घकाळ सुविहितपणे सुरू राहावे, यासाठी अभिनव अशी कार्यान्वयन आणि देखभाल व्यवस्था
  • ओडीएफ ++ - सेप्टिक टाक्या आणि गटारांच्या यांत्रिक साफसफाईवर भर. वापरलेल्या पाण्याचे सुरक्षित संकलन आणि प्रक्रिया तसेच मल गाळाचे सुरक्षित व्यवस्थापन.
  • वॉटर + - पर्यावरण-जलप्रदूषण रोखण्यासाठी वापरलेले पाणी आणि मल गाळ या दोन्हींचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि पुनर्वापर यावर लक्ष केंद्रित केले आहे.

सुधारित स्वच्छ अभियान प्रमाणपत्र  प्रोटोकॉल जाहीर करताना, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव, मनोज जोशी यांनी प्रमाणीकरण प्रक्रिया अधिक व्यापक होण्यासाठी, ह्या प्रक्रियेत सातत्याने, सुधारणा करत राहण्याची गरज असल्यावर भर दिला.  ह्या प्रोटोकॉलमध्ये बदल, सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही एका साध्या प्रक्रियेसह पुढे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत. सुधारित स्वच्छ भारत प्रोटोकॉल अधिक कार्यक्षमतेवर भर देणारे आहेत. तसेच, अधिका-यांना आणि नागरिकांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ते सोप्या भाषेत मांडले गेले आहेत.प्रोटोकॉलचा उद्देश केवळ शहरांची क्रमवारी सुधारणे नाही तर शहरांना, या अभियानामागची भावना साध्य करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.असे जोशी यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानाविषयीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी या अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Website: https://sbmurban.org/

Facebook: Swachh Bharat Mission - Urban | Twitter: @SwachhBharatGov

Instagram: sbmurbangov | Youtube: Swachh Bharat Urban       

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1837012) Visitor Counter : 75


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri