माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या सामन्यांचे  फक्त डीडी स्पोर्टस् च्या सर्व केबल आणि डीटीएच वाहिन्यांवर थेट प्रसारण

Posted On: 24 JUN 2022 10:21PM by PIB Mumbai

 

भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय तीन सामने तर टी ट्वेन्टीचे पाच सामने हे दोन संघ खेळणार आहेत. या दोन संघात होणाऱ्या या सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण केवळ डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. डीडी स्पोर्ट्स जुलैच्या दौऱ्यातील सर्व भारत-वेस्ट इंडिज सामने डीडी फ्री डिश व्यतिरिक्त सर्व केबल आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे. क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाशिवाय तज्ज्ञ आणि क्रिकेट मान्यवरांशी सामनापूर्व आणि सामन्यानंतरच्या विश्लेषणावर आधारित विशेष कार्यक्रमदेखील डीडी स्पोर्ट्स प्रसारित करेल. ही क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट ठरेल.

 

दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक

Date

Match

IST Timing

22.07.2022

1st ODI

7 PM

24.07.2022

2nd ODI

7 PM

27.07.2022

3rd ODI

7 PM

29.07.2022

1st T20

8 PM

01.08.2022

2nd T20

8 PM

02.08.2022

3rd T20

8 PM

06.08.2022

4th T20

8 PM

07.08.2022

5th T20

8 PM


***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1836852) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu , Hindi