दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

C-DOT ने 5G रेडिओ ऍक्सेस नेटवर्क (RAN) उत्पादने आणि सोल्यूशन्सच्या सहकार्यात्मक  विकासासाठी गॅलोर नेटवर्कबरोबर केला करार


या कराराचा उद्देश स्टार्टअप्सच्या माध्यमातून बहु-भागीदार  स्वदेशी 5G परिसंस्था तयार करणे हा आहे

Posted On: 24 JUN 2022 9:26PM by PIB Mumbai

 

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) स्थानिक उद्योग आणि स्टार्ट-अप्ससह स्वदेशी 5G परिसंस्थेच्या विविध हितधारकांसह मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. सी-डॉट आउटपुट प्रणित आणि लक्ष्य-केंद्रित वातावरणात प्रमुख 5G कंपन्यांमधील  निकोप स्पर्धेसाठी अनेक  5G भागीदारांना सहाय्यक ठरणारी  समन्वित सहकार्यात्मक चौकट  विकसित करण्यावर अधिक भर देत आहे.

5G च्या स्वदेशी विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नात, सी-डॉट  आणि गॅलोर  नेटवर्क्सने 5G RAN उत्पादने आणि सोल्यूशन्सच्या सहकार्यात्मक विकासासाठी करार केला आहे.

विविध परिसंस्था  भागीदारांमध्ये समन्वय आणि सुसंवाद साधण्यावर आधारित हा सहकार्यात्मक  दृष्टीकोन परस्पर उत्पादक आणि शाश्वत आघाडीच्या  उत्क्रांतीस चालना देईल. हे एक उत्प्रेरक म्हणून काम करेल , ज्यामुळे स्वदेशी रचना , विकास, उत्पादन आणि किफायतशीर 5G उत्पादने आणि सोल्युशन्स उपलब्ध  होतील.  भारतीय संशोधन आणि विकास  आणि उद्योगाची तांत्रिक क्षमता आणि पूरक सामर्थ्य एकाच व्यासपीठावर आणेल. यामुळे स्वदेशी बौद्धिक संपदा (IP) मालमत्ता निर्माण होईलजागतिक स्तरावर देशी तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार  आणि व्यवसायीकरणासाठी नवीन संधी निर्माण होतील.

या कार्यक्रमात बोलतांना, सी-डॉटचे कार्यकारी संचालक डॉ. राजकुमार उपाध्याय  यांनी भारताच्या स्थानिक संशोधन आणि विकास , उद्योग, स्टार्टअप मधील  तांत्रिक सामर्थ्याच्या  अंतर्निहित क्षमतेवर  भर देण्याच्या  पंतप्रधानांच्या गती शक्ती आणि आत्मनिर्भर भारत उपक्रम अधोरेखित केले.

गॅलोर नेटवर्क्सचे संचालक बालाजी कुलोथुंगन म्हणाले, भारतीय दूरसंचार उद्योगासाठी हा खरोखर "आत्मनिर्भर" क्षण आहे. भारतीय आणि जागतिक  श्रेणी -1 मधील  दूरसंचार ऑपरेटर्स, क्रिटिकल नेटवर्क्स आणि खाजगी नेटवर्कसाठी 5G उत्पादने विकसित करण्यासाठी आम्ही सी-डॉट  सोबत एकत्र काम करू.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1836843) Visitor Counter : 88


Read this release in: English , Urdu , Hindi