पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने  'हरित हवामान निधीवर  (जीसीएफ) लक्ष केंद्रित करून भारताच्या हवामान वित्तविषयक गरजा आणि त्यातील गुंतवणूक  समजून घेणे" या विषयावर हितसंबंधीतांशी  सल्लामसलत कार्यशाळा आयोजित

Posted On: 24 JUN 2022 8:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या हरित हवामान निधी सज्जता कार्यक्रमाअंतर्गत 24 जून 2022 रोजी, भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने  "'हरित हवामान निधीवर  (जीसीएफ) लक्ष केंद्रित करून भारताच्या हवामान वित्तविषयक गरजा आणि त्यातील गुंतवणूक समजून घेणे"या विषयावर हितसंबंधितांशी सल्लामसलत कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा भारताच्या हवामान वित्तविषयक  गरजा समजून घेण्यासाठी आणि भारतातील हवामानाशी मिळत्याजुळत्या विकासामध्ये गुंतवणुकीला गती देण्यासाठी आणि त्या प्रमाणात आवश्यक गुंतवणुकीसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. 

भारताच्या महत्त्वाकांक्षी हवामानविषयक कृती पूर्ण करण्यासाठी खर्चाच्या विस्तारकक्षा समजून घेण्याच्या गरजेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून हे  यासाठी  आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण दर्शवेल तसेच कमी कार्बन आणि लवचिक विकासाला  चालना देणारी धोरणे निश्चित करण्यातही  मदत होईल, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव  लीना नंदन यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.  खाजगी भांडवल जमवण्यासाठी  आणि त्याचा फायदा घेण्यासाठी निधीच्या सार्वजनिक स्त्रोतांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील यावर त्यांनी जोर दिला. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या आकांक्षांशी जुळवून घेण्यासाठी  हवामानविषयक वित्तपुरवठ्याची व्याप्ती, प्रमाण आणि गती यात त्याप्रमाणात वाढ करावी लागेल यावरही त्यांनी  भर दिला.

भारताच्या वित्तपुरवठा गरजांचे मूल्यांकन करणे आणि गरजा पूर्ण करण्यासाठी हवामान वित्त विषयक  लाभ घेणे या विषयावरील दोन तांत्रिक सत्रांद्वारेविविध आर्थिक साधनांवर लक्ष केंद्रित करून हवामानविषयक कृतींसाठी भारताच्या आर्थिक गरजा समजून घेण्यावर या कार्यशाळेचा भर होता. या कार्यशाळेमध्ये भारत सरकार, खाजगी क्षेत्र आणि वित्तीय संस्थांमधील मान्यवर सहभागी झाले होते.शाश्वत विकासाच्या मार्गाच्या दिशेने अत्यंत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक वित्तपुरवठ्याची  मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे मार्ग या कार्यशाळेत सुचवण्यात आले. कार्यशाळेत आर्थिक साधनांच्या व्यवहार्यतेवर भर देण्यात आला. शाश्वततेचा  मार्ग वित्त आणि मानवी, तांत्रिक, संस्थात्मक आणि नियामक क्षमतेची गरज लक्षणीयरीत्या वाढवतो. देश विकासाच्या वाटेवर वाटचाल करत असताना आर्थिक संसाधने आणि त्या क्षमता वाढतात,हे मुद्दे या कार्यशाळेत नमूद करण्यात आले. या कार्यशाळेत रीवा सौर उर्जा प्रकल्पाचे अनुभव आणि यशोगाथा तसेच त्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक  आकर्षित करणे आणि विश्वसनीय  प्रकल्प स्त्रोतांची  रचना करण्याची आवश्यकता देखील व्यक्त करण्यात आली.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1836822) Visitor Counter : 50


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri