वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ओएनडीसी सल्लागार परिषदेची बैठक
Posted On:
23 JUN 2022 3:48PM by PIB Mumbai
ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स (ONDC) या उपक्रमाचा उद्देश डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर वस्तू आणि सेवांच्या आदानप्रदान संबंधी सर्व पैलूंसाठी खुल्या नेटवर्कला चालना देणे हा आहे , ज्याला उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण सात कंपन्यांनी- एक खरेदीदार संबंधी अॅप, पाच विक्रेता अॅप आणि एक लॉजिस्टिक सेवा पुरवठादार अॅप - यांनी ओएनडीसी प्रोटोकॉल स्वीकारले आहेत आणि त्यांनी स्वतः ओएनडीसीशी सुसंगत अॅप्स तयार केले आहेत. हे अॅप्स बंगळुरू, नवी दिल्ली, भोपाळ, शिलाँग आणि कोईमतूर या पाच निवडक शहरांमध्ये किराणा, खाद्यपदार्थ आणि पेये श्रेणीत प्रायोगिक टप्प्यात संपूर्ण ओएनडीसी नेटवर्कवर व्यवहार पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ओएनडीसी सल्लागार परिषदेची बैठक झाली, त्यात ही माहिती देण्यात आली.
ओएनडीसी छोटे व्यापारी, एमएसएमई आणि उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याचे पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले. ओएनडीसीने प्रायोगिक टप्प्यात डिजिटल माध्यमातून सहभागी व्यापाऱ्यांना उत्तम परिणाम दिले आहेत, ओएनडीसीने बिगर-डिजिटल व्यापारी, हस्तकला कलाकार आणि कारागीर यांचा समावेश करण्याच्या धोरणांना प्राधान्य द्यायला हवे , जेणेकरून या विभागांना ई-कॉमर्सचे लाभ मिळू शकतील. गोयल यांनी विभागाला ओएनडीसी आधारित ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी स्टार्टअप इंडियाची मदत घ्यायला सांगितले. ओएनडीसी आणि नाबार्ड कृषी क्षेत्राला ओएनडीसीमध्ये आणण्यासाठी एक कार्यक्रम आखत आहेत आणि पहिले पाऊल म्हणून शेतकरी उत्पादक संस्थासाठी अभिनव उपाय शोधण्यासाठी 1-3 जुलै दरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836749)
Visitor Counter : 185