आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 196.77 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 3.61 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 88,284

गेल्या 24 तासात 17,336 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.59%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.07%

Posted On: 24 JUN 2022 9:32AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 196.77 कोटींहून अधिक (1,96,77,33,217) मात्रांचा टप्पा पार केला. 2,54,91,739 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

 

16 मार्च 2022 पासून  12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.61  कोटींहून अधिक (3,61,10,152) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे  लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,560

2nd Dose

1,00,59,858

Precaution Dose

55,92,724

FLWs

1st Dose

1,84,22,707

2nd Dose

1,76,17,764

Precaution Dose

98,60,147

Age Group 12-14 years

1st Dose

3,61,10,152

2nd Dose

2,20,43,359

Age Group 15-18 years

1st Dose

6,02,28,410

2nd Dose

4,81,52,150

Age Group 18-44 years

1st Dose

55,80,26,045

2nd Dose

49,93,71,367

Precaution Dose

22,98,086

Age Group 45-59 years

1st Dose

20,34,07,175

2nd Dose

19,29,99,021

Precaution Dose

22,37,870

Over 60 years

1st Dose

12,72,22,912

2nd Dose

12,05,22,287

Precaution Dose

2,31,52,623

Precaution Dose

4,31,41,450

Total

1,96,77,33,217

 

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 88,284 इतकी आहे. हे प्रमाण देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.20%  आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.59% इतका आहे. गेल्या 24 तासांत 13,029 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,27,49,056. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 17,336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण  4,01,649  कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.98  कोटींहून अधिक (85,98,95,036) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.07% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  4.32%. नोंदविण्यात आला आहे.

***

 S.Thakur/S.Chavan/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836671) Visitor Counter : 180