अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
''भारतासाठी भविष्यातील पोषक अन्न'' या संकल्पनेवर आधारित बाजरीसारख्या भरड धान्यावरील राष्ट्रीय परिषदेचे अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते उद्घाटन
दुष्काळाच्या काळात भरड धान्य भांडार मानले जाते: प्रल्हाद सिंह पटेल
भारताचे पोषण परिणाम सुधारण्यासाठी भरड धान्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे: अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
Posted On:
23 JUN 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
नवी दिल्लीत अन्न मंत्रालयाच्या सहाय्याने असोचेम (ASSOCHAM) या उद्योग संस्थेने आयोजित केलेल्या 'भारतासाठी भविष्यातील पोषक अन्न' या संकल्पनेवर आधारित बाजरीसारख्या भरड धान्यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या हस्ते आज झाले. अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशात भरड धान्याचे उत्पादन 2020-21 मध्ये 17.96 दशलक्ष टन झाले , 2015-16 मध्ये हे उत्पादन 14.52 दशलक्ष टन होते आणि याच कालावधीत बाजरीचे (पर्ल मिलेट ) उत्पादन देखील 10.86 दशलक्ष टन झाले आहे, असे आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
सामान्य परिस्थितीतही दीर्घकाळ सहज टिकण्याच्या क्षमतेमुळे,भरड धान्य देखील दुष्काळाच्या काळात भांडार मानले जाते, असे प्रल्हादसिंह पटेल म्हणाले.
बाजरीसारख्या भरड धान्यावरील राष्ट्रीय परिषदेत भरड धान्यांच्या फायद्यांविषयी बोलताना, केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री म्हणाले की, भरड धान्ये ही देशातील सर्वात जुन्या खाद्य पदार्थांपैकी एक आहे.
हे छोट्या बियाण्यांपासून घेतले जाणारे पीक आहे जे कोरड्या भागात किंवा कमी सुपीक जमिनीवरही चांगले वाढू शकते त्यामुळे ते भारताचे पोषक अन्न म्हणून ओळखले जाते.
भारताचे पोषण परिणाम सुधारण्यासाठी भरड धान्ये मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतातील प्रमुख भरड धान्य उत्पादक राज्यांमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश होतो.
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836564)
Visitor Counter : 273