अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या उपयोजनेअंतर्गत अर्ज मागवले आहेत (PMKSY)
Posted On:
21 JUN 2022 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2022
भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या पुढील उप योजनेअंतर्गत अर्ज मागवले आहे (PMKSY) :
- शेतीमालावर प्रक्रिय करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठीची योजना (APC)
- अन्न प्रक्रिया आणि साठवण क्षमता तयार करणे / वाढवणे यासाठीची योजना (एकक योजना ) (CEFPPC)
- एकात्मिक शीत साखळी आणि मूल्य वर्धन पायाभूत सुविधा योजना (Cold Chain)
- अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा (FTL)
- ऑपरेशन ग्रीन्स - दीर्घकालीन उपाययोजना (OG)
अन्न प्रक्रियेसंबंधित उद्योग सुरू करू इच्छिणारे पात्र संभाव्य प्रवर्तक / गुंतवणूकदार / नव उद्योजक आपले ऑनलाइन अर्ज https://sampada-mofpi.gov.in या संकेतस्थळावरुन दिनांक 27 जून 2022 या दिवशी सकाळी 10 पासून भरु शकतील.
हे अर्ज www.mofpi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित उपयोजनेच्या दिनांक 08.06.2022 रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमावली अनुसार विहित नमुन्यात केलेले असावेत.
बोली पूर्व बैठक दिनांक 4 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता खोली क्रमांक 120, पंचशील भवन, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली येथे होईल.
उप योजनेअंतर्गत स्वारस्य पत्र प्रतिसादाअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन स्वतंत्रपणे केले जाईल आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या तसेच संबंधित उप योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार किमान पात्रता मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या अर्जांना गुणवत्तेनुसार मंजुरी देण्यात येईल.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या एका आठवड्याच्या आत मूळ धनादेश मंत्रालयाकडे पोहोचेल असा पाठवावा.
ऑनलाइन अर्ज दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5.00 पर्यंत सादर करता येतील.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836104)
Visitor Counter : 260