भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) योग्य नियामक अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत गैर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांवरील (आरयूपीपी) कारवाई सुरु ठेवली आहे
Posted On:
21 JUN 2022 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2022
भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) योग्य नियामक अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत गैर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांवरील (आरयूपीपी) कारवाई सुरु ठेवण्याचा आदेश 25 मे 2022 रोजी आदेश जारी केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयोगाच्या बैठकीनंतर हा आदेश जारी करण्यात आला. बैठकीला निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडेही उपस्थित होते. या आदेशात, मुख्य निवडणूक अधिकार्यांना आरपी अधिनियम 1951 च्या संबंधित कलम 29ए आणि 29सी साठी आरयूपीपी पक्षांनी योग्य अनुपालनाची अंमलबजावणी करावी यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
25 मे 2022 पर्यंत अस्तित्वात नसलेल्या 87 आरयूपीपी पक्षांची मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाचा पाठपुरावा म्हणून, कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात, आयोगाने आज (20 जून, 2022) 111 अतिरिक्त आरयूपीपी पक्षांना आयोगाच्या रजिस्टरमधून हटवण्याचा निर्णय घेतला. या 111 आरयूपीपी पक्षांच्या, संपर्काचा पत्ता, कलम 29ए(4) अंतर्गत नोंदणीची आवश्यकता म्हणून वैधानिकरित्या आवश्यक होता; पत्त्यातील कोणताही बदल कलम 29ए(9) अंतर्गत निवडणूक आयोगाला कळवणे आवश्यक होते. त्यांनी याचे पालन केले नाही. संबंधित आरयूपीपी पक्ष पडताळणीत अस्तित्वात नसल्याचे आढळून आले किंवा आयोगाच्या दिनांक 25.05.2022 च्या आदेशानुसार जारी केलेली पत्रे टपाल विभागाद्वारे वितरित न होता परत आली आहेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळवले आहे.
याबाबत कोणत्याही पक्षाला आक्षेप असल्यास, हा आदेश जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित मुख्य निवडणूक अधिकारी/निवडणूक आयोगाकडे ते पक्ष अस्तित्वाचे सर्व पुरावे, इतर कायदेशीर आणि नियामक अनुपालनांसह वर्षनिहाय वार्षिक लेखापरीक्षण, योगदान अहवाल, खर्चाचा अहवाल, आर्थिक व्यवहारांसाठी (बँक खात्यासह) अधिकृत स्वाक्षरीसह पदाधिकाऱ्यांचे अद्ययावतीकरण यासह संपर्क साधू शकतात असा निर्णय आयोगाने घेतला.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836001)
Visitor Counter : 221