उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे – उपराष्ट्रपती


योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग करा आणि त्याचे लाभ घ्या- उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 21 JUN 2022 10:51AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जून 2022

सिकंदराबाद येथे परेड ग्राउंडवर पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू  सहभागी झाले.या कार्यक्रमात  शेकडो लोक  सहभागी झाले. उपराष्ट्रपतींनी योग प्रात्यक्षिक केले आणि कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या भाषणात, नायडू म्हणाले की योग  ही  भारताने जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे आणि प्रत्येकाने योगाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवावे आणि त्याचे लाभ घ्यावेत, असे आवाहन केले. निरोगी राहण्याचे उपाय म्हणून योगावर आणखी संशोधन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या प्राचीन तत्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन केवळ आपले मन आणि शरीरात बदल घडविण्यासाठीच नव्हे तर राष्ट्राच्या सर्वांगिण परिवर्तनासाठी कार्य करण्याच्या गरजेवर  त्यांनी भर दिला. ``तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आणि तुमचे काम प्रामाणिकपणे पार पाडले, तर राष्ट्राची प्रगती निश्चितच अधिक वेगाने होऊ शकते,`` असे त्यांनी नमूद केले.

निरोगी जीवनाच्या महत्त्वावर जोर देऊन नायडू यांनी नागरिकांमध्ये चांगले आरोग्य आणि आनंद वृद्धिंगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन या सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

उपराष्ट्रपती असेही म्हणाले की, योगाला वय, जात, धर्म आणि प्रांत यांचे बंधन नाही, तो   वैश्विक आहे,`` असे सांगून  लोकांनी योगाचा सराव करावा,प्रचार करावा आणि नेहमीच अभिमान बाळगावा, असे ते म्हणाले.

केंद्रिय मंत्री जी. किशन रेड्डी, ऑलिम्पिक पदक विजेती  पी व्ही सिंधू आणि अन्य या सोहळ्यास उपस्थित होते.

***

NC/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1835805) Visitor Counter : 279