मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साजरा करण्याच्या निमित्ताने उद्या गुजरातमधील मोढेरा येथील सूर्य मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला होणार सहभागी

Posted On: 20 JUN 2022 4:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2022

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विशेष दिवस  म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त आयुष मंत्रालय देशभरातील विशेष महत्त्वाच्या 75 ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. पंतप्रधान कर्नाटकातील म्हैसूरु, येथून होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री पुरुषोत्तम रुपाला,उद्या मोढेरा सूर्य मंदिर, मेहसाणा, गुजरात येथे आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2022 च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत. मोढेरा येथील सूर्य मंदिरात साडेचार हजारांहून अधिक दुग्ध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी आणि इतर मान्यवर या योग दिन सोहळ्यात सामील होणार आहेत.

"मानवतेसाठी योग" ही यंदाच्या वर्षीच्या आयडीवाय (IDY) 2022 ची संकल्पना आहे. सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला (AKAM) अधोरेखित करतच हा सोहळा संपूर्ण जगभरात भव्य पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. आयडीवायचा  (IDY) मुख्य उद्देश लोकांमध्ये योगाच्या आरोग्यविषयक लाभांबाबत जनजागृती करणे हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये,आयडीवाय(IDY) ही आरोग्यासाठी एक लोकचळवळ बनली आहे.

भारत सरकारचे मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ गुजरात (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड,NDDB), गुजरात सहकारी दूध विपणन महामंडळ,(गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन,GCMMF) आणि मेहसाणा जिल्हा सहकारी दुग्धोत्पादक संघ लि.( मेहसाणा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन लि) यांच्या संयुक्त विद्यमाने  मोढेरा सूर्य मंदिर, मेहसाणा, गुजरात येथे आयडीवाय( IDY)-2022 साजरा करण्यात येत आहे.

आयडीवाय 2022 साठी आयुष मंत्रालय या नोडल मंत्रालयाने प्रसारित केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार हे सर्व योग कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 

  

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1835531) Visitor Counter : 242