रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बेंगळुरू निदघट्टा विभागाच्या सहा पदरीकरणाचे  काम अनेक आश्वांसनासह प्रगतीपथावर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Posted On: 19 JUN 2022 3:24PM by PIB Mumbai

 

जगातील सर्वोत्तम पायाभूत सुविधांच्या उभारणीवर 21व्या शतकातील नव भारताचा भर आहे, हे लक्षात घेऊनच राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बंगळुरू निदघट्टा विभागाच्या सहा पदरीकरणाचे काम अनेक आश्वासने आणि शक्यतांसह प्रगतीपथावर असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशांमध्ये सांगितले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001ZKVV.jpg

बेंगळुरू ते निदगट्टा हा भाग बेंगळुरू दक्षिण विभागातील पंचमुखी मंदिर जंक्शनपासून सुरू होतो आणि निदगट्टाच्या आधी संपतो. हा रस्ता पर्यटन आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा भाग आहे कारण तो बिदाडी, चन्नापटणा, रामनगर या शहरांमधून जातो. या शहरांत आशियातील रेशीम कोशांची (cocoons) सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील एकमेव गिधाड अभयारण्यात प्रवेश येथूनच करावा लागतो. हा रस्ता पुढे श्रीरंगपट्टणम, म्हैसूर, उटी, केरळ आणि कूर्गलाही जोडला जाईल, तो जोडला, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00287WK.jpg

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, सध्याची 3 तासांची प्रवास वेळ 90 मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधनाचा वापर आणि कार्बन फूटप्रिंट कमी होईल, असे त्यांनी सांगितले. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या प्रकल्पात वाहन अंडरपास/ओव्हरपास उपलब्ध करणे यासारख्या रस्ते सुरक्षा सुधारणांसह विशेष काळजी घेण्यात आली आहे असेही ते म्हणाले. या मार्गावरचे 6 बाह्यवळण रस्ते वाहतुकीची कोंडी कमी करतील. त्यामुळे बिदाडी, रामनगरा, चन्नरायपटना, मद्दूर, मंड्या आणि श्रीरंगपट्टणम सारख्या शहरांचे (एकूण 51.5 किमी लांबीचा हा पट्टा) आरोग्य, पर्यावरण सुधारेल आणि रस्ते सुरक्षेची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

'सबका साथ, सबका विकास' या वचनाची पूर्तता करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची पथके देशाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक गतिमान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि समृद्धी आणण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.

***

S.Thakur/P.Jambhekar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835288) Visitor Counter : 171