युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

मेजर ध्यानचंद स्टेडियममधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पहिल्या स्क्वॉश कोर्टचे केंद्रीय मंत्री डॉ. जयशंकर आणि अनुराग ठाकूर यांनी केले उद्‌घाटन

Posted On: 15 JUN 2022 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2022

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बुधवारी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये स्क्वॉश कोर्टचे उद्‌घाटन केले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने देशभरातील एखाद्या केंद्रात उघडलेले हे पहिलेच स्क्वॉश कोर्ट आहे. उद्‌घाटन समारंभाला क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी,भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी)चे संचालक (प्रकल्प) निलेश शाह हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, स्क्वॉश खेळाबद्दल उत्साही असलेले 68 वर्षांचे डॉ. जयशंकर, म्हणाले की, आज स्क्वॉश कोर्टचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. संपूर्ण प्रकल्प आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी क्रीडा मंत्रालयाची आहे. बहुतांश खेळांना आता मान्यता मिळत आहे आणि  पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांनी तंदुरुस्त जीवनशैली विकसित करण्याचा आणि प्रतिभेला वाव देण्यासाठी दिलेला संदेश सर्वत्र दुमदुमत आहे. मोदीजी नेहमी शारीरिक तंदुरुस्ती, स्पर्धात्मकता आणि मानसिक सामर्थ्य यावर भर देतात, जे नव्या भारतासाठी आवश्यक आहे.

भारत सरकारच्या योजनांचा फायदा युवा चॅम्पियन्सना कसा होऊ शकतो याचा संदर्भ देत अनुराग ठाकूर म्हणाले कीमला पूर्ण विश्वास आहे की अशा जागतिक दर्जाच्या  स्क्वॉश साठीच्या पायाभूत सुविधांमुळे येत्या काही वर्षांत  अनेक होतकरू चॅम्पियन्सवर निश्चितपणे लक्ष केंद्रित केले  जाईल आणि आपण आपल्या टारगेट ऑलिम्पिक पोडियम योजना आणि खेलो इंडिया योजनेद्वारे त्यांना पाठबळ देण्यासाठी सज्ज आहोत.

 

 

 

 

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 1834402) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi