खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खनिज उत्पादनात एप्रिल 2022 मध्ये झाली 7.8% वाढ

Posted On: 15 JUN 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2022

खाण आणि उत्खनन क्षेत्रांतील खनिज उत्पादनाचा निर्देशांक एप्रिल, 2022 या महिन्यात116.0 वर,गेला असून याच पातळीच्या तुलनेत एप्रिल 2021पेक्षा तो 7.8% जास्त होता(आधार: 2011-12=100)

इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मधील महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनाची पातळी पुढील प्रमाणे  होती: कोळसा 665 लाख टन, लिग्नाइट 40 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2748 दशलक्ष क्युबीक मीटर,पेट्रोलियम (क्रूड) 25 लाख टन, बॉक्साइट 2054 हजार टन, क्रोमाईट 455 हजार टन, तांबे कॉन्स.  8 हजार टन, सोने 111 किलो, लोह खनिज 218 लाख टन, शिसे कॉन्स 26 हजार टन, मॅंगनीज धातू 248 हजार टन, जस्त कॉन्स.124 हजार टन, चुनखडी 343 लाख टन, फॉस्फोराईट 120 हजार टन, मॅग्नेसाइट 8 हजार टन आणि हिरा 2 कॅरेट.

एप्रिल 2021 च्या तुलनेत एप्रिल 2022 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनामध्ये पुढील धातू समाविष्ट आहेत: मॅग्नेसाइट (44.3%), मॅंगनीज धातू (28.9%), कोळसा (28.8%), लिग्नाइट (28.4%), बॉक्साइट (18.5%), जस्त कॉन्स(10.5%), नैसर्गिक वायू (U) (6.4%), आणि फॉस्फोराईट (0.5%).  नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनामध्ये पुढील धातू उत्पादने समाविष्ट आहेत: पेट्रोलियम (क्रूड) (0.9%), चुनखडी (-2.7%), तांबे (-4.2%), लोहखनिज (-5.6%), शिसे कॉन्स. (-11.2%)  , क्रोमाइट (-16.1%), आणि सोने (-22.4%)

 

  

 

 

 

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1834395) Visitor Counter : 194


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi