अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन उद्या गोव्यात करणार धरोहर या राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे राष्ट्रार्पण
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2022 3:49PM by PIB Mumbai
पणजी/मुंबई, 9 जून 2022
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक सप्ताह महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन उद्या गोव्यात पणजी येथे 'धरोहर' हे राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालय देशाला समर्पित करणार आहेत.

मांडवी नदीच्या काठी पणजीच्या प्रसिद्ध ब्लू बिल्डिंगमध्ये हे धरोहर संग्रहालय आहे. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत पूर्वी अल्फांडेगा या नावाने ओळखली जाणारी ही दुमजली इमारत 400 वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी उभी आहे.
धरोहर हे देशातील अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय आहे. भारतीय सीमाशुल्क विभागाद्वारे देशभरातून जप्त केलेल्या कलाकृती या संग्रहालयात आहेत. आईने- अकबरीची हस्तलिखिते, अमीन खांबांची प्रतिकृती, जप्त केलेल्या धातूच्या आणि दगडी कलाकृती, हस्तिदंती व वन्यजीव वस्तू ही या प्रदर्शनातील प्रमुख लक्षणीय आकर्षणे आहेत.
सीमाशुल्क प्रक्रिया नेमकी काय आहे याची माहिती सामान्य लोकांना व्हाही यासाठी येथे सोय केलेली आहे. नव भारतातील सर्वात ऐतिहासिक अप्रत्यक्ष कर सुधारणा, वस्तू आणि सेवा कर निर्मितीचा प्रवास दर्शविणारी जीएसटी गॅलरी अलीकडेच या संग्रहालयात समाविष्ट करण्यात आली आहे.
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1832880)
आगंतुक पटल : 254