कृषी मंत्रालय
कृषी राज्यमंत्री, शोभा करंदलाजे यांनी केले ब्रिक्स कृषिमंत्र्यांच्या 12 व्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व
Posted On:
09 JUN 2022 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2022
ब्रिक्स कृषिमंत्र्यांची12 वी बैठक काल संध्याकाळी आभासी मंचावर आयोजित करण्यात आली. या बैठकीला चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, रशिया आणि भारताचे कृषिमंत्री उपस्थित होते.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले. भारत सरकारने कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी टाकलेली विविध पावले आणि हाती घेतलेल्या पीएम किसान, पंतप्रधान पीक विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका , नैसर्गिक शेती, एफपीओची निर्मिती आणि प्रोत्साहन इ. उपक्रमांवर कृषिराज्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर करून शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्याच्या त्यायोगे भूकमुक्तीच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट्यांची पूर्तता करण्याच्या भारताच्या संकल्पावर शोभा करंदलाजे यांनी भर दिला.
पोषक अन्नधान्ये आणि पिकांच्या जैवसुदृढीकृत जातीच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या राष्ट्रीय अन्न आणि पोषण विषयक मोहिमेबद्दल त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विशेषत्वाने अन्न आणि पोषण सुरक्षिततेमध्ये आणि हवामानाशी जुळवून घेण्यासंदर्भात बाजरीसारख्या तृणधान्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ब्रिक्स राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे करावे यासाठी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ब्रिक्स कृषी मंत्र्यांनी “समन्वित कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ब्रिक्स राष्ट्रांमध्ये सहकार्य मजबूत करणे” या संकल्पनेसह बाराव्या बैठकीचे संयुक्त घोषणापत्र स्वीकारले आणि ब्रिक्स सदस्य देशांमधील अन्न सुरक्षा सहकार्यावरील ब्रिक्स भूमिकेविषयी सहमती दर्शवली.
* * *
S.Kakade/S.Auti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832718)
Visitor Counter : 222