युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 चे उद्घाटन


केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद 2014 मधील 864 कोटी वरून 2022 मध्ये 1,992 कोटी इतकी वर आणली: अमित शाह

खेलो इंडिया युवा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा हे पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचं फलित: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 04 JUN 2022 2:42PM by PIB Mumbai

 

बहुप्रतीक्षित एसबीआय खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021, हरियाणा येथे शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरु झाल्या. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी एका दिमाखदार सोहोळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन केलं.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001MJTW.jpg

या उद्घाटन सोहोळ्याला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, देशाची निर्विवादपणे क्रीडा राजधानी असलेलं हरियाणा हे राज्य खेलो इंडिया युवा स्पर्धांच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करत आहे, याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो. खेळाडूंना शक्य असलेले सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचे हे फलित आहे. केंद्रसरकारने क्रीडा क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद 2014 मधील 864 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 1,992 कोटी रुपये इतकी वाढवली असून देशाने मिळवलेली टोकियो ऑलिम्पिकमधील 7 पदके, जी पदक संख्या यापूर्वीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत 5 इतकी होती, हा या निर्णयाच्या यशाचा पुरावा आहे. तसेच 2016 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाला चार पदके मिळाली होती. तर 2021 मधील स्पर्धेत यात वाढ होऊन पदक संख्या 19 वर पोहोचली आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002NNRL.jpg 

पुढील 10 दिवस चालणार्‍या या स्पर्धेतील 5 भारतीय क्रीडा प्रकारांसह एकूण 25 उत्कंठावर्धक क्रीडा प्रकारांमध्ये 2,262 महिला खेळाडूंसह एकूण 5000 क्रीडा पटू सुवर्ण पदकासाठी आपल्या अत्युत्तम कामगिरीचं प्रदर्शन करतील. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003X8UA.jpg

या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने आपली सर्वोत्तम कामगिरी करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणामधून केलं. ते म्हणाले, खेलो इंडिया युवा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाचं फलित आहे. खेळाडूंना आवश्यक असलेलं सर्व प्रकारचं सहाय्य सुनिश्चित करणं हा त्यांचा दृष्टीकोन आहे. जवळजवळ 2500 खेळाडूंसाठी दरमहा 10,000 रुपये भत्ता असो, खेलो इंडिया अकादमीमधील खेलो इंडियाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठीचे 5 लाख रुपये अर्थसहाय्य अथवा टॉप्स (TOPS) अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठीचे वैयक्तिक सहाय्य, परदेशामधील स्पर्धांचा अनुभव देणे आणि प्रत्येकी 6 लाख रुपयांचा वार्षिक भत्ता अशा प्रकारे खेळाडूंना सर्व प्रकारचे सहाय्य सरकार करत आहे. एक खेळाडू म्हणून तुम्ही केवळ उत्तम कामगिरी करायची आहे. तुम्हाला आपल्या गरजांबाबत अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही ती काळजी आम्ही घेऊ.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004PH15.jpg

***

S.Thakur/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831302) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi