उपराष्ट्रपती कार्यालय
दक्षिण-दक्षिण सहकार्याची तत्त्वे भारत आणि आफ्रिका यांच्यातील उत्साहवर्धक आणि मैत्रीपूर्ण संबंधांना अधोरेखित करतात: उपराष्ट्रपती
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2022 5:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी, जलद आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आफ्रिकन राष्ट्रांसोबतच्या आर्थिक संबंधांमधील पूरक बाबींचा आणि संधींचा पूर्णपणे शोध घेण्याचे आवाहन केले.ते म्हणाले की जागतिक "दक्षिण-दक्षिण सहकार्य" च्या तत्त्वांनी भारताच्या सर्व आफ्रिकन देशांसोबतच्या उत्साहवर्धक आणि मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित केले आहेत. ते पुढे म्हणाले की, जागतिक प्रशासन आणि जागतिक विकासामध्ये भारत एक अग्रभागी नेतृत्व म्हणून उदयास येत असल्याने, आफ्रिकन राष्ट्रे भारताचे विश्वासू भागीदार असून त्याच्या समृद्धीतील भागधारक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.
श्री नायडू काल ‘तिरंगा आणि तेरंगा -भारत आणि सेनेगल यांच्यातील राजनैतिक संबंधांची वर्षे’ या विषयावर सेनेगल-पश्चिम या आफ्रिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या-डकार या विद्यापिठात शेख अंता डायप येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करत होते. श्री नायडू आफ्रिकन देशाच्या या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, ही भारताच्या राष्ट्रपतींनी सेनेगलला दिलेली पहिलीच अधिकृत भेट आहे.




G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1831137)
आगंतुक पटल : 225