सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणातर्फे 9 जून रोजी बंदा सिंग बहादूर यांच्या 306 व्या हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा स्मारक पोस्टरचे प्रकाशन
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत बाबा बंदा सिंग बहादूर यांचे हुतात्मा स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण पंतप्रधानांकडे मागणी करणार : अर्जुन राम मेघवाल
प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी देखील जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना महान शीख योद्धा बाबा बंदा सिंग बहादूर यांच्या हुतात्मा स्मारकाविषयी माहिती दिली
Posted On:
03 JUN 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2022
राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज नवी दिल्ली येथे 9 जून रोजी बंदा सिंग बहादूर यांच्या 306 व्या हुतात्मा दिना निमित्ताने ‘ हुतात्मा स्मारक पोस्टर’ प्रकाशित केले. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, बंदा बहादूर हे खूप धाडसी होते कारण तत्कालीन प्रशासनाने त्यांच्या मुलाची हत्या केल्यावरही त्यांनी संयम बाळगला. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले हे बलिदान सर्वोच्च मानायला पाहिजे, असेही ते म्हणाले. मेहरौली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत बाबा बंदा सिंग बहादूर यांचे हुतात्मा स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची प्राधिकरणाची पंतप्रधानांकडे मागणी केली जाईल आणि ती पूर्ण करण्यासाठी संस्कृती मंत्रालय शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
किशन रेड्डी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि मंत्रालयाकडून सहकार्याचे आश्वासन दिले.
बाबा बंदा सिंग बहादूर हे भारताचे रक्षण करणारे आणि मुघलांचा पराभूत करणारे महान योद्धे होते. त्यांचे मूळ नाव बाबा माधव दास होते आणि ते एक बैरागी साधूपुरुष होते. राष्ट्रीय प्रबोधन आणि मुघलांच्या जुलमी राजवटीपासून देशाची मुक्तता करणे हे बाबा बंदा सिंह बहादूर यांचे ध्येय होते. भारताला स्वातंत्र्य खूप नंतर मिळाले असले तरीही बाबा बंदा सिंग बहादूर यांनीच प्रथम भारतीयांना लढायला, जिंकायला आणि स्वतंत्र राजवट स्थापन करायला शिकवले.
बाबा बंदा सिंग बहादूर आणि त्यांचा मुलगा अजय सिंग हे 9 जून 1716 रोजी त्यांच्या इतर 18 साथीदारांसह मेहरौली येथील कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या समाधीच्या गेटजवळ शहीद झाले. कसाईंनी आधी त्यांचा मुलगा अजय सिंगला मारले. बंदा बहादूर अविचल राहिले . त्यानंतर बाबा बंदा सिंग बहादूर यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या गौरवशाली हौतात्म्याने गुरु ग्रंथसाहिबमधील भगत कबीर यांचे वर्णन मान्य केले आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830987)
Visitor Counter : 178