श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

औद्योगिक कामगारांसाठीच्या एप्रिल 2022 च्या अखिल भारतीय उपभोक्ता मूल्य निर्देशांकामधे 1.7 अंकांची वृद्धी

Posted On: 31 MAY 2022 6:14PM by PIB Mumbai

 

एप्रिल 2022 साठीचा अखिल भारतीय सीपीआय-आयडब्ल्यू मध्ये 1.7 अंक वृद्धी झाली असून तो 127.7 ( एकशे सत्तावीस पूर्णांक सात) इतका झाला आहे एका महिन्यातील टक्केवारी बदला नुसार यात 1.35 टक्के वृद्धी झाली असून गेल्या वर्षी याच काळात ही वृद्धी 0.42 टक्के इतकी होती.

निर्देशांकात झालेल्या वृद्धीमधील सर्वात जास्त वाटा प्रामुख्याने अन्न आणि पेये गटाचा असून त्यामुळे 0.80 टक्के अंक इतका बदल झाला आहे. तांदूळ, गव्हाचे पीठ, बटाटा, टोमॅटो कॉलिफ्लॉवर, फरसबी, लिंबू, वांगी, सफरचंद, केळी, संत्री, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, डेरी मिल्क, गाईचे दूध, शिजवलेले अन्नपदार्थ, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल ऑटो रिक्षा भाडे, बस भाडे, ऍलोपॅथी औषधे, मोबाईल फोन, मोटरसायकल वगैरे वस्तू निर्देशांकातील वृद्धीसाठी कारणीभूत आहेत. परंतु, कांदा, शेवगा शेंग, कारले, पडवळ, हिरवी मिरची, गाजर, कोंबडीची अंडी, विजेचे भाडे, पुष्पगुच्छ या वस्तूंनी निर्देशांकाच्या वृद्धीवर मर्यादा घातली. 

केंद्र पातळीवर गुरूग्रामने सर्वात जास्त 7.4 अंकांची वृद्धी नोंदवली त्यापाठोपाठ जालंदरने 6.5 अंकांनी वृद्धी नोंदवली. अन्य केंद्रांपैकी 3 केंद्रांनी 5 ते 5.9 दरम्यान, 3 केंद्रांनी 4 ते 4.9, 3 केंद्र 3 ते 3.9, 23 केंद्र 2 ते 2.9, 32 केंद्र 1 ते 1.9 आणि 19 केंद्रांनी 0.1 ते 0.9 अंकांदरम्यान वृद्धी नोंदवली. दार्जीलिंगने 0.8 अंक इतकी सर्वात जास्त घसरण नोंदवली, त्यापाठोपाठ अलवर आणि शिलॉंगचा क्रमांक लागतो.

महिन्याचा वार्षिक आधारावरील  चलन फुगवटा 6.33 इतका होता. मागील वर्षांत तो 5.35 होता, तर मागील वर्षांत या महिन्याच्या पुढील महिन्यात तो 5.1 4 टक्के इतका होता. तसेच अन्न धान्यावर आधारित चलन फुगवटा 7.05 टक्के होता. मागील वर्षी 6.27 टक्के होता.  

श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे कार्यालय असलेल्या कामगार ब्युरो ने देशातील 88 औद्योगिक महत्वाच्या केंद्रांमधून मिळवलेल्या 317 बाजारांमधील किरकोळ किमतीवर आधारून  औद्योगिक कामगारांसाठीचा मासिक ग्राहक मूल्य निर्देशांक एकत्रित केला जात असतो.

Y-o-Y Inflation based on CPI-IW (Food and General)

All-India Group-wise CPI-IW for March, 2022 and April, 2022

Sr. No.

Groups

March, 2022

 April, 2022

I

Food & Beverages

125.4

127.5

II

Pan, Supari, Tobacco & Intoxicants

144.1

144.4

III

Clothing & Footwear

123.9

125.6

IV

Housing

118.9

118.9

V

Fuel & Light

160.6

164.9

VI

Miscellaneous

123.9

125.8

 

General Index

126.0

127.7

 

 

 

CPI-IW: Groups Indices

 

***

G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1829908) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Telugu