माहिती आणि प्रसारण मंत्रालय

#MIFF2022 मध्ये सादर होणाऱ्या ईशान्य भारतातील चित्रपटांच्या पॅकेजमध्ये लघुपटांपेक्षा माहितीपटांना प्राधान्य

Posted On: 31 MAY 2022 8:24PM by PIB Mumbai

मुंबई, 31 मे 2022

 

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये निर्माण झालेल्या माहितीपटांना लघुपटांच्या तुलनेत कमी मागणी आहे असे प्रतिपादन मिफ्फ 2022 मध्ये सादर होणाऱ्या ईशान्य प्रदेशातील राज्यांच्या चित्रपटांच्या पॅकेजचे निर्माते चंदन शर्मा यांनी केले आहे. ‘देशाच्या ईशान्य भागात अनेक लोक काल्पनिक लघुपट तयार करतात कारण त्यांना माहित आहे की, लघुपटांना चांगली मागणी आहे. आणि ह्याच कारणामुळे, मिफ्फ 2022 मध्ये सादर करण्यासाठी ईशान्य भारतातील राज्यात निर्माण झालेल्या चित्रपटांचे पॅकेज तयार करताना माहितीपटांना प्राधान्य देण्यात आले आहे. 14 चित्रपटांच्या या पॅकेजमध्ये 11 माहितीपट असून केवळ 3 लघुपट आहेत.” ते पुढे म्हणाले. 17 व्या मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी संबंधित चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या #MIFFDialogues या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना चंदन शर्मा बोलत होते.

या पॅकेजसाठी चित्रपटांची निवड करताना लावलेल्या निकषांबद्दल त्यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले की, चित्रपटाचा दर्जा आणि कथेतील वैविध्य यांच्या बाबतीत देखील कोणतीही तडजोड करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले. ‘ए लिटील सनशाईन’ या आसामी चित्रपटाचे  दिग्दर्शक सुमन दुवारा आणि निर्माते डॉ.हितेश बरुआ यांनी देखील या चर्चेत भाग घेतला. सुमन दुवारा म्हणाले की , ‘याअ लिटील सनशाईन’ ही वृध्द लोकांचे नातेसंबंध, प्रेम आणि एकटेपणा यांचे वर्णन करणारी गोष्ट आहे. ही कथा पाळीव कुत्र्यासोबत राहणाऱ्या एका वृध्द जोडप्याभोवती आणि त्यांच्या मुलाने त्यांना या कुत्र्याला सोडून द्यायला सांगितल्यामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीभोवती फिरते.

   

ईशान्य भारतातील राज्यांमधून या पॅकेजसाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांची यादी खाली दिली आहे.

  • अरुणाचल प्रदेश
  • द गालोज
  • द साँग्ज वुई सिंग, द ड्रम्स वुई बीट
  • आसाम
  • सँक्च्युरी
  • द आसामीज सिख्स
  • नाओका (टू बी इल्युजन्स!! डाईंग अँड लाईज)
  • अ लिटील सनशाईन
  • फोर्जिंग फ्युचर
  • मणिपूर
  • 50 इयर्स ऑफ मणिपुरी सिनेमा : ए ग्लिम्प्स इंडिया
  • मणिपूर माइंड स्केप्स
  • मेघालय
  • बिकॉज वुई डिड नॉट चूझ
  • मिझोराम
  • धिस इज मिझोराम
  • द अनसर्टन इयर्स (हून किर्ह)
  • नागालँड
  • अंडर द लाँगफुरु स्काय
  • सिक्कीम
  • द एंडलेस नोट इंडिया

 

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Chitnis/Darshana/MIFF-32

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829895) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi