माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अँनिमेशनपट निर्मात्या रेगिना पेसो यांचे मिफ मास्टरक्लासमध्ये मार्गदर्शन


वैयक्तिक आणि वैश्विक यात साधलेले संतुलन हेच माझ्या चित्रपटांचे सामर्थ्यः रेगिना पेसो

साधे सरळ विषय लोकांना चित्रपटांशी सहजतेने जोडतात

Posted On: 31 MAY 2022 8:10PM by PIB Mumbai

मुंबई, 31 मे 2022

 

साधेसोपे विषय जगभरातील लोकांना अगदी सहजतेने जोडतात, असे मत नामवंत पोर्तुगीज अँनिमेशनपट निर्मात्या रेगिना पेसो यांनी व्यक्त केले आहे. 17व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या मिफ मास्टरक्लासमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी चित्रपटांच्या विषयांचे महत्त्व विषद केले. सर्वांच्या परिचयाचे असलेले सामाईक, सहजसोपे आणि सार्वत्रिक विषय लोकांना सहजतेने जोडत असल्याने मी नेहमीच असे विषय निवडते आणि माझ्या दृष्टीकोनाप्रमाणे चित्रांचा वापर करते जे अतिशय वैयक्तिक आहे. वैश्विक आणि वैयक्तिक यातील संतुलन हेच माझ्या चित्रपटांचे सामर्थ्य आहे अशी माहिती त्यांनी दिली.

आपले चित्रपट वैयक्तिक अनुभवावर आधारित असतात आणि त्यातील चित्रांची रचना संगणकावर करण्याऐवजी त्यांचे रेखाटन त्या स्वतः करतात, असे त्यांनी सांगितले.

या विषयावर अधिक विवेचन करताना रेगिना म्हणाल्या, “ एखादा चित्रपट बनवण्यासाठी मी आठ टप्प्यांचा अंगिकार करते, यामध्ये व्यापक प्रमाणात संकल्पना किंवा उद्देश, प्रोत्साहन, माहितीपट संशोधन, कम्फर्ट झोन, व्हिज्युअल रिसर्च, वैयक्तिक शैली गृहित धरणे, प्रत्यक्षात अवलंब करणे आणि अंतिम परिणाम यांचा समावेश असतो.”

त्यांनी द नाईट या आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी माहिती दिली. हा चित्रपट प्लास्टर प्लेट्सवर कोरलेल्या चित्रांच्या ऍनिमेशन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आणि ट्रॅजिक स्टोरी विथ हॅप्पी एन्ड(2005), काली द लिटल व्हॅम्पायर(2012) आणि अंकल थॉमस- अकाउंटिंग फॉर द डेज(2019) यांसारखे उल्लेखनीय चित्रपट तयार केले.

या सत्राचे सूत्रसंचालन भारतातील नामवंत ऍनिमेशनपट निर्मात्या ध्वनी देसाई यांनी केले.

जन्माने पोर्तुगीज असलेल्या ऍनिमेशन पट निर्मात्या रेगिना पेसो यांचा जन्म टीव्ही किंवा सिनेमा नसलेल्या एका लहानशा गावात झाला. चलचित्रे तयार करण्याचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतले नाही. तरीही आयुष्यातील काही गूढ घडामोडींनी त्यांना चित्रपटनिर्माती बनवले. त्यांचे चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि 2006 मध्ये ऍनेसी इंटरनॅशनल ऍनिमेशन फेस्टिव्हल मध्ये ग्रँड प्रिक्ससह अनेक बहुमान मिळवले आहेत. 2018 मध्ये त्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस(हॉलिवुड) च्या सदस्य बनल्या.

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Patil/Darshana/MIFF-30

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829889) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi