मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. परशोत्तम रुपाला 75 उद्योजकांचे संमेलन आणि 75 स्वदेशी पशु प्रजातींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2022 6:29PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री परशोत्तम रुपाला उद्या नवी दिल्ली येथे आयोजित ’75 उद्योजक आणि 75 स्वदेशी पशु प्रजातीं’च्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी ते संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. राज्य मंत्री, एफएएचडी डॉ. एल. मुरुगन आणि राज्य मंत्री, एफएएचडी डॉ. संजीव कुमार बलयान यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाने सीआयआय च्या सहयोगाने हे संमेलन आयोजित केले आहे. दुग्धव्यवसाय आणि पशुपालन करणारे शेतकरी, नावोन्मेषी व्यावसायिक, स्टार्टअप आणि उद्योग यासह बोवीन/काप्रीन/एविअन/पोर्सीन या 75 उत्कृष्ट स्वदेशी प्रजातींचे डिजिटल प्रदर्शन याला या संमेलनात विशेष महत्त्व असेल.
या संमेलनातील सत्रांमध्ये उत्पादन वाढवणे आणि प्राण्यांचे आरोग्य सुधारणे, मूल्य वृद्धी आणि बाजारपेठेशी संबध प्रस्थापित करणे, नावोन्मेष आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या तीन संकल्पनांवर आधारित तांत्रिक सत्रांवर विशेष भर दिला जाईल. बाजारातील महत्वाचे प्रवाह प्रदर्शित करणे, संधी ओळखणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रासाठी स्पष्ट मार्ग आखणे हे या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
***
G.Chippalkatti/R Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1829817)
आगंतुक पटल : 474