माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विद्यार्थ्यांच्या चित्रपटांतून युवा प्रतिभा ऊर्जेचे दर्शन

Posted On: 29 MAY 2022 6:50PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2022

 

मिफ्फ 2022 अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटीय परिघातून आपल्याला केवळ भूतकाळ अथवा वर्तमानकाळच नव्हे तर भविष्यकाळातील देखण्या निर्मितीचे देखील दर्शन होते. विविध प्रथितयश संस्थांमधील विद्यार्थ्यांद्वारे निर्मित चित्रपटांच्या विशेष पॅकेजचा समावेश करून मिफ्फ 2022 ने चित्रपट क्षेत्रातील युवा प्रतिभांची जोपासना करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे अगदी खरे आहे.

अहमदाबाद येथील राष्ट्रीय डिझाईन संस्था (एनआयडी), कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एसआरएफटीआय), पुणे येथील महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था (एमआयटी) आणि केरळ येथील के.आर.नारायणन चित्रपट संस्था अशा नावजलेल्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रतिभा आणि सर्जनशीलतेच्या चैतन्याचे दर्शन या महोत्सवामध्ये घडणार आहे. म्यानमारच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले अॅनिमेशन माहितीपट तसेच ब्राझीलच्या विद्यार्थ्यांच्या अॅनिमेशन चित्रपट महोत्सवातील काही चित्रपटांच्या समावेशाने मिफ्फ महोत्सवातील चित्रपट संग्रहाला अधिक रंगत आणि उत्साहाची जोड मिळणार आहे.

मिफ्फ 2022 मध्ये युवा चित्रपट निर्मात्यांना चित्रपट उद्योगातील तज्ज्ञ व्यक्तींची भेट घेण्याची तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. तसेच महोत्सवात सहभागी होणारे विविध चित्रपट निर्माते, चित्रपट संस्था, निर्मिती संस्था, समीक्षक वर्ग, महत्त्वाच्या ओटीटी संस्था, समन्वयक आणि  विविध प्रभावक मंडळींकडून या युवा चित्रपट निर्मात्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटांची नोंद देखील घेतली जाईल.

विद्यार्थ्यांच्या चित्रपटांच्या पॅकेजमधील चित्रपट एकांतवास, मिथके, लोकसंगीत, निसर्ग संवर्धन, कोविड महामारी, महिलांवरील अत्याचार अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणारे आहेत.

मिफ्फ 2022 महोत्सवात प्रदर्शित होणारे खालील चित्रपटविषयक शैक्षणिक संस्थांनी निर्माण केलेले नाविन्यपूर्ण चित्रपट पाहण्यास कृपया विसरू नका.

  1. ऑरोव्हिले चित्रपट संस्था – 11 चित्रपट, 2 तास 30 मिनिटे
  2. के. आर. नारायणन राष्ट्रीय दृक् शास्त्रीय आणि कला संस्था (केआरएनएनआयव्हीएसए), केरळ – 6 चित्रपट, 1 तास 2 मिनिटे
  3. महाराष्ट्र तंत्रज्ञान संस्था – कला, संरेखन आणि तंत्रज्ञान (एमआयटी-एडीटी), पुणे - 6 चित्रपट, 2 तास 21 मिनिटे
  4. राष्ट्रीय संरेखन संस्था (एनआयडी), अहमदाबाद - 7 चित्रपट, 2 तास 10 मिनिटे
  5. सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एसआरएफटीआय), कोलकाता - 7 चित्रपट, 1 तास 40 मिनिटे
  6. यांगून चित्रपट शिक्षण संस्था, म्यानमार - 8 चित्रपट, 36 मिनिटे

 

Register online for MIFF 2022 at https://miff.in/delegate2022/?cat=ZGVsZWdhdGU=

Students can register for free at https://miff.in/delegate2022/?cat=c3R1ZGVudF9kZWxlZ2F0ZQ==

For Media registration visit : https://miff.in/delegate2022/?cat=bWVkaWE=

* * *

PIB MIFF Team | S.Thakur/S.Chitnis/Darshana/MIFF-13

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829251) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi