माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फ 2022 मध्ये दिग्गज नॉन-फीचर चित्रपट निर्मात्यांच्या निवडक चित्रपट प्रदर्शनातून त्यांना आदरांजली

Posted On: 29 MAY 2022 4:35PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2022

 

महोत्सवाची परंपरा कायम राखत 17 व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2022 (MIFF) मध्ये नॉन-फिचर  म्हणजे माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांच्या उदयात तसेच योगदान दिलेल्या  दिग्गज चित्रपट निर्मात्यांना आदरांजली वाहण्यात येईल  या विभागात, त्यांचे चित्रपट आणि त्यांच्यावर बनवलेले चित्रपट दाखवले जातील.

या महोत्सवात दिग्गज आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते चेचिलिया मँजिनी (इटली), जॅक ड्रुइन (कॅनडा) आणि तोशियो मात्सुमोटो (जपान) यांच्या चित्रपटांचा उत्सव साजरा केला जाईल. भारतीय दिग्गजांमध्ये , यश पाल चौधरी, मुकेश चंद्र, पॉल एस. कोळी, राजा आर स्वामी, नंदकुमार बी. सदामते, एन. स्टॅनले, भक्ती जगदीश पुळेकर, इरोम मायपा, चिदानंद दासगुप्ता, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम बेनेगल, सुमित्रा भावे, राहत युसुफी आणि अजित हरी यांचे  चित्रपटही महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

     

   

 

चित्रपटांची यादी

  • चेचिलिया  मँजिनी(इटली) यांना आदरांजली  - 2 चित्रपट, 2 तास 12 मिनिटे
  • इरोम मायपा (भारत) यांना आदरांजली   - 3 चित्रपट
  • सुमित्रा भावे (भारत) यांना आदरांजली  - 3 चित्रपट, 1 तास 48 मिनिटे
  • यश पाल चौधरी (भारत) यांना आदरांजली   - 3 चित्रपट, 1 तास 6 मिनिटे

 

शताब्दी स्मृती चित्रपट 

चिदानंद दासगुप्ता यांचे स्मरण 

 

मास्टर्स ऑफ अॅनिमेशन फिल्म्स- आदरांजली 

मिफ्फ  2022 मध्ये अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील  दिवंगत दिग्गजांचे चित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहण्यात येईल.  

 

  • गौतम बेनेगल (भारत) - 4 चित्रपट,2 तास
  • जॅकीज ड्रॉइन (कॅनडा) -2 चित्रपट, 47 मिनिटे
  • तोशियो मात्सुमोटो (जपान) - 4 चित्रपट, 55 मि

 

Register online for MIFF 2022 at https://miff.in/delegate2022/?cat=ZGVsZWdhdGU=

Students can register for free at https://miff.in/delegate2022/?cat=c3R1ZGVudF9kZWxlZ2F0ZQ==

For Media registration visit : https://miff.in/delegate2022/?cat=bWVkaWE=

* * *

PIB MIFF Team | R.Aghor/S.Kakade/Darshana/MIFF-11

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829201) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali