माहिती आणि प्रसारण मंत्रालय
17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: जाणून घ्या कोण आहेत ज्यूरी सदस्य
Posted On:
29 MAY 2022 4:03PM by PIB Mumbai
मुंबई, 29 मे 2022
सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जाणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातल्या चित्रपटांसाठी आलेल्या प्रवेशिकांममधून उत्तम चित्रपट निवडण्याचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. या महोत्सवासाठी ज्यूरी म्हणून काम पाहिलेल्या मान्यवर ज्यूरी सदस्यांविषयी माहिती जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गट- ज्यूरी सदस्य
- एस. नालामुथू (भारत)
- अनंत विजय (भारत)
- मीना रॅड (फ्रान्स)
- जीन पिएर सेरा (फ्रान्स)
- डॅन वॉलमन (इस्राएल)
एस. नालामुथू : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय काही पुरस्कारांसह पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार. ‘जॅक्सन होल वन्यजीव चित्रपट महोत्सवा’चे नियमित परीक्षक आणि ‘इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सव’ (2021) चे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष. ‘लिविंग ऑन द एड्ज’ ही पांडा पुरस्कार विजेती पर्यावरणीय मालिका, ‘टायगर डायनेस्टी’ (2012-13), ‘टायगर क्वीन’ (2010), ‘द वर्ल्ड फेमस टायगर’ (2017), बीबीसी वर्ल्डसाठी व अॅनिमल प्लॅनेटसाठी अनुक्रमे ‘अर्थ फाईल’ (2000) व ‘द वर्ल्ड गॉन वाईल्ड’ (2001) माहितीपट ही काही विशेष उल्लेखनीय कामे.
अनंत विजय : चित्रपट, संस्कृती व साहित्याचे राजकारण या विषयांवर 20 वर्षांपेक्षा जास्त काळ लेखन, मुद्रित व टीवी पत्रकारिता. ‘दैनिक जागरण’ वर्तमानपत्रात 12 वर्षे सातत्याने साप्ताहिक सदर लेखन सुरू. हिंदी भाषेचा अभ्यास व आवडीमुळे विविध साहित्य महोत्सवांचे आयोजक, हिंदी साहित्यविषयक संपादकीय मंडळांवर सल्लागार. वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि कोकणी चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष.
मीना रॅड : इराणी वंशांच्या फ्रान्स स्थित माहितीपटकार, निर्मात्या व पत्रकार. बीबीसी, रेडिओ फ्रान्स, फ्रान्स प्रेससाठी मध्य आशियाई देशांमधील राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील पुरस्कार विजेत्या पत्रकारितेने कारकीर्दीची सुरूवात. जीन रूश यांच्या कार्याने प्रेरित चित्रपटकारांना एकत्र आणण्यासाठी 2014 पासून पॅरीस इथे होणाऱ्या ‘अपाय वॅरेन महोत्सवा’च्या संचालक. ‘फॉर मी द सन नेव्हर सेट्स’ (2012) ह्या पहिल्याच माहितीपटाला तेहरानमधील ‘सिनेमा वेरिटे चित्रपट महोत्सवा’त सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार.
जीन पिएर सेरा : जागतिक ख्यातीचे निर्माते, दिग्दर्शक. स्ट्रासबर्ग इथे ‘द सेंटर ड्रामाटिक द लेस्त’मधून रंगमंच कारकीर्दीची सुरुवात. 1970 मध्ये पुरस्कार विजेत्या तीन लघुपटांनी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात. सेर्ज लरॉय, रॉजर हानिन आणि लिलिअॅन द कर्माडेक यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक. ‘ओजूरिएन फ्रान्स’ हा त्यांचा कार्यक्रम जगातील 180 वाहिन्यांवरून प्रसारित. त्यांची निर्मिती असलेले 30 पेक्षा जास्त चित्रपट व माहितीपट जगभरातील पुरस्कारांचे विजेते.
डॅन वॉलमन : चित्रपटनिर्माते, रंगमंच दिग्दर्शक. पहिलाच चित्रपट ‘द ड्रीमर’ (1970) चा कान चित्रपट महोत्सवात प्रवेश. ‘फ्लॉक’ (1972), ‘माय मायकेल’ (1974), ‘अॅन इस्राएली लव स्टोरी’ (2008) आणि ‘वॅली ऑफ स्ट्रेंथ’ (2010) हे काही विशेष उल्लेखनीय चित्रपट. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अलिकडेच ‘जेरुसलेम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘लाइफटाईम अचिवमेंट’ आणि ‘शिकागो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘सिल्वर ह्युगो’ पुरस्कारांनी सन्मानित. तत्पूर्वी, ‘एरिक आइन्स्टाईन पुरस्कार’ (2015) व ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘लाइफटाईम अचिवमेंट’नेही सन्मानित.
राष्ट्रीय स्पर्धा गट- ज्यूरी सदस्य
- संजीत नार्वेकर (भारत)
- सुभाष सेहगल (भारत)
- जयश्री भट्टाचार्य (भारत)
- अॅश्ली रत्नविभूषण (श्रीलंका)
- तारीक अहमद (बांग्लादेश)
संजित नार्वेकर : विविध माध्यमांमध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट इतिहासकार, लेखक, प्रकाशक आणि माहितीपटकार. माजी संपादक ‘स्क्रीन’ (1980-91), ‘टी.वी. अँड विडिओ वर्ल्ड’ (1994-95), ‘डॉक्युमेंटरी टुडे’ (2007-12). राष्ट्रीय समीक्षक परीक्षक मंडळ, मिफ्फ (2006), चित्रपट लेखन पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (1999) साठी परीक्षक. ‘मराठी सिनेमा इन इंट्रोस्पेक्ट’ (1995) ह्या पुस्तकाला सिनेमाविषयक उत्कृष्ट पुस्तक म्हणून सुवर्ण कमळ.
सुभाष सेहगल : भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी उद्योगात 250 पेक्षा जास्त चित्रपटांचे संकलक. विद्यार्थीदशेत ‘फिल्म अँड टेलिविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये संकलन विषयात सुवर्ण पदक विजेते. मुंबईतील चित्रपट उद्योगासह हिंदी व पंजाबी चित्रपटांच्या संकलनासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे विजेते.
जयश्री भट्टाचार्य : अग्रगण्य रंगमंच कलाकार, चित्रपटकार, पुरस्कार विजेते माहितीपट, लघु व चित्रपटांच्या दिग्दर्शिका. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आत्या अभिनेत्री केया च्रकवर्ती यांच्याकडून रंगमंचविषयक धडे घेण्यास सुरुवात. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षक व ईशान्य भारतात काही रंगमंच कार्यशाळांचे आयोजन. बुद्धदेव दासगुप्ता व ऋतूपर्णो घोष यांच्या उत्तोरा (2000) चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शनाने चित्रपट कारकीर्दीची सुरुवात. ‘मोंदो मेयेर उपाख्यान’ (2002), ‘चोखेर बाली’(2003), ‘शुभो महुरत’(2003) ही काही विशेष उल्लेखनीय कामे.
अॅश्ली रत्नविभूषण : पत्रकार, लेखक, चित्रपट समीक्षक. श्रीलंकेतील ‘आशियाई चित्रपट केंद्रा’चे संचालक व ‘सिनेसिथ’ पत्रिकेचे संस्थापक संपादक. श्रीलंकेतील चित्रपट जगासमोर उलगडून मांडणारे अग्रणी. श्रीलंकेतील चित्रपटाची सुरुवातीची वर्षे आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगविषयक शोधनिबंधांचे व श्रीलंकेतील चित्रपटाचा इतिहासविषयक लेखक. ‘नेटवर्क फॉर द प्रोमोशन ऑफ एशिया पॅसिफिक सिनेमा’चे विद्यमान सदस्य आणि परीक्षक समन्वयक.
तारीक अहमद : 25 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक माहितीपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे चित्रपटकार आणि निर्माते. सिनेमाविषयक पुस्तकांचे लेखक. तळागाळातील व्यावसायिकांना संधी देणाऱ्या माध्यमे व संवाद संस्थेचे दशकभरासाठी नेतृत्व. ह्या माध्यमातील अनुभव व ज्ञानाधारे बांग्लादेशात स्थानिक व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत विविध उल्लेखनीय माहितीपट साकार.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/R.Bedekar/Darshana/MIFF-10
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829194)
Visitor Counter : 361