माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मिफ्फ 2022 ला शुभेच्छा दिल्या
Posted On:
28 MAY 2022 7:34PM by PIB Mumbai
17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून सुरू होत असून राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.
“वास्तव चित्रित करण्यात आणि जगभरातील लोक आणि समाजाचा संघर्ष, आकांक्षा आणि जीवन ठळकपणे नव्या स्वरूपात समोर आणण्यात माहितीपट, छोटे काल्पनिक लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांची विशेष भूमिका असते. मला आशा आहे की यंदाचा मिफ्फ महोत्सव जगभरातील चित्रपट प्रेमींना नवीन दृष्टीकोन, कथा आणि वेगळा अनुभव देईल आणि त्याद्वारे लोक, समुदाय आणि राष्ट्रांमध्ये बंध निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल,” असे राष्ट्रपतींनी आपल्या विशेष संदेशात म्हटले आहे.”
मिफ्फने त्याच्या स्थापनेपासूनच जगभरातील चित्रपट निर्मात्यांना दृश्य माध्यमाच्या सामर्थ्याद्वारे रंजक कथा आणि कल्पना सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे अशा शब्दांत राष्ट्रपतींनी गौरवपूर्ण उल्लेख केला. “शहराचे सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन समृद्ध करणारा महोत्सव म्हणून उदयाला आला आहे,” असे ते म्हणाले.
***
ST/SK/CY/MIFF-8
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829139)
Visitor Counter : 153