माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-मिफ्फ 2022 उद्या म्हणजेच 29 मे पासून होणार सुरु


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

Posted On: 28 MAY 2022 9:10PM by PIB Mumbai

मुंबई, May 28, 2022

सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 चे उद्या,म्हणजेच 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजता वरळीतल्या नेहरू केंद्रातील सभागृहात उद्घाटन होणार आहे. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल, या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री, कपिल मोरेश्वर पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड असे मंत्री आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शाजी एन करुण, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा हे या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सतरावा मिफ्फ अनेक अर्थांनी विशेष ठरणार आहे. या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात, 119 चित्रपट दाखवले जातील, तसेच स्पर्धा क्षेत्रांत, 264 चित्रपट दाखवले जातील. या मिफ्फ मध्येही, विशेष पॅकेजेस, रेट्रोस्पेक्टिव्ह, होमेज, बी-टू-बी, मास्टर क्लासेस यांच्यासह विविध कार्यशाळाही आयोजित केल्या जातील.

बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, यंदा बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकसम्हणून निवड करण्यात आली आहे. 11 बांग्लादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज, ‘कंट्री ऑफ फोकसअंतर्गत मिफ्फ मध्ये दाखवले जाणार आहे. यात, समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट, हसीना- ए डॉटर्स टेलचित्रपटाचा देखील समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि मोठ्या राजकीय नेत्या, शेख हसीना, यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

नेटफ्लिक्सची मूळ मालिका "मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल" च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 

17 वा मिफ्फ, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरुपात आहे, आणि तो पूर्णपणे मोफत आहे.

यावर्षीचा मिफ्फ पहिल्यांदाच मिश्र स्वरुपात होत आहे. या अंतर्गत चित्रपट रसिकांना स्पर्धा आणि प्रीझम विभागतले चित्रपट प्रतिनिधींना नोंदणी करुन जगभरात कुठेही ऑनलाईन बघता येतील.

शॉर्ट्स टीव्ही ने तयार केलेळे ऑस्कर फिल्म पॅकेज, इटली आणि जपानमधील चित्रपटांचे विशेष पॅकेज, इंडियन पॅनोरामा- यात अलीकडेच झालेल्या इफफीमधील निवड झालेले चित्रपट यांचा समावेश यात होणार आहे. त्याशिवाय, ईशान्य भारतातील चित्रपट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट, पॉकेट फिल्म्स मधील सर्वोत्तम लघुपट, तसेच सत्यजित रे यांच्या सुकुमार रेह्या पुनरुज्जीवित चित्रपटाचे विशेष प्रदर्शन देखील या महोत्सवात होणार आहे.

चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms / #FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !

#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?

जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.

कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवातचित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील.  ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk   या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट  उपलब्ध झाल्यावर  बघता येतील.

***

PIB MIFF Team |  G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor/MIFF-7

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829051) Visitor Counter : 193


Read this release in: Odia , English , Hindi , Urdu