राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य भारती या संस्थेनं मध्य प्रदेशात भोपाळ इथं आयोजिलेल्या 'एक राष्ट्र - एक आरोग्य व्यवस्था ही काळाची गरज ' या विषयावरच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं संबोधीत

Posted On: 28 MAY 2022 3:29PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मध्य प्रदेशात भोपाळ मध्ये 'एक राष्ट्र - एक आरोग्य व्यवस्था ही काळाची गरज' या विषयावरच्या कार्यक्रमाला संबोधीत केलं. आरोग्य भारती या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

नागरिकांना आरोग्यपूर्ण बनवणं या व्यापक दृष्टीकोनातून, आरोग्य भारती ही संस्था गेल्या दोन दशकांपासून संघटनात्मक पद्धतीनं काम करत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. जेव्हा प्रत्येक व्यक्ती आरोग्ययुक्त असेल, तेव्हा सर्व कुटुंब आरोग्यपूर्ण होईल   आणि जेव्हा प्रत्येक कुटुंब आरोग्यमय  असेल तर प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर आरोग्य समृध्द  होईल, आणि अशा तऱ्हेनंच संपूर्ण देशही आरोग्य पूूर्ण  होईल याच विचारधारेतून आरोग्य भारती ही संस्था काम करत आहे, आणि त्यांची ही विचारधारा अतिशय साधी आणि स्पष्ट आहे असं राष्ट्रपती म्हणाले. आरोग्य भारतीनं आपल्या उपक्रमांचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर केल्याबद्दल त्यांनी संस्थेचं कौतुकही केलं.

केंद्र सरकारने 2017 साली राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केलं आहे. या धोरणात नमूद केल्याप्रमाणे सर्वांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण आरोग्यविषयक सेवा परवडणाऱ्या दरात देता याव्यात आणि त्या प्रत्येकासाठी उपलब्ध असाव्यात हेच केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे असं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाच्यादृष्टीनं आरोग्य सुविधांची व्यापक व सर्वांगीण व्यवस्था उपलब्ध करून देणं हेदेखील या धोरणाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासकीय आणि खासगी क्षेत्रातील संस्थांच्या सहभागासोबतच समाजातील सर्व घटकांचा सहभाग असायला हवा. यात विशेषत: जागरूक नागरिकांचं सहकार्य मिळायला हवं असं ते म्हणाले. यादृष्टीनं पाहीलं तर आरोग्य भारती या संस्थेने जनजागृती करत आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थांमधील लोकांना एकत्र आणूत मोठा सकारात्मक प्रयत्न केला आहे असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. आरोग्यभारती ही संस्था आधुनिक जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करत 'प्रतिबंधात्मक आणि प्रबोधक' आरोग्यसेवेला प्राधान्य देण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला धरूनच आपलं काम करत आहे.

Please click here to see the President's Speech in Hindi

***

G.Chippalkatti/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828963) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi