आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सर गंगा राम रुग्णालयाच्या स्कूल ऑफ नर्सिंगचा 66 वा दीपप्रज्वलन समारंभ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते संपन्न
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2022 10:28PM by PIB Mumbai
सर गंगा राम रुग्णालयाच्या स्कूल ऑफ नर्सिंगचा 66 वा दीपप्रज्वलन समारंभ आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी समारंभाला संबोधित केले. या दीपप्रज्वलन सोहळ्याच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या परिचारिका व्यवसाय क्षेत्रातील प्रवेशाला औपचारिक मान्यता प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पदविका आणि गुणवत्ता प्रमाणपत्रेही प्रदान केली गेली.


परिचर्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य क्षेत्रातील भूमिका किती महत्वाची आहे, हे अधोरेखित करत भारती पवार म्हणाल्या , “परिचर्या ही एक कला आहे, विज्ञान आहे या व्यवसायात हे सर्व पैलू अतिशय उत्तम रित्या एकत्रित झाले आहेत. एका प्रशिक्षित परिचारिकेत आध्यात्मिक गुणही असायला हवे, जेणेकरुन ती रुग्णांची शुश्रूषा करुन, मानववतेची सेवा करु शकेल. परिचारिका रुग्णालयांचा पाया असतात तसेच त्या रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत. “ परिचारिका आरोग्य क्षेत्राचा कणा आहेत. कोविड महामारीच्या काळातही आपण हे अनुभवले आहे. अशा अत्यंत कठीण काळात, परिचरिकांनी बजावलेली भूमिका प्रशंसनीय होती.”असे त्या पुढे म्हणाल्या.
“भक्कम, मजबूत आरोग्य क्षेत्रासाठी, तेवढीच उत्तम परिचर्या व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. आपण ही व्यवस्था अधिक भक्कम केली तर आपोआपच आरोग्य सेवा क्षेत्रांत सुधारणा होईल.यामुळे आपण आजाराना प्रतिबंध करण्याचे उद्दिष्टही साध्य करु शकू, तसेच, सार्वत्रिक आरोग्याचे व्यापक लक्ष्यही साधण्यात मदत होईल.”
देशातील आरोग्य क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत, डॉ पवार म्हणाल्या की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली,केंद्र सरकार देशात एक भक्कम आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी काम करत आहे. त्याचवेळी प्रतिबंधात्मक आरोग्य निगा याकडेही लक्ष असून, देशात अत्याधुनिक उपचार पद्धती आणण्यावर सरकारचा भर आहे. देशात डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत, त्याचवेळी आरोग्य सुविधा सर्वसामान्य गरीब लोकांपर्यंत पोहचवणे आणि उपचारांचा खर्च कमी करण्यावरही आम्ही काम करत आहोत.”
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1828853)
आगंतुक पटल : 210