पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत ड्रोन महोत्सव 2022- या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन


"किमान सरकार - कमाल प्रशासन या मार्गाचा” अवलंब करत बरोबर 8 वर्षांपूर्वी आम्ही भारतात सुशासनाचे नवीन मंत्र अंमलात आणण्यास सुरुवात केली."

"तंत्रज्ञानाने विकासाची दृष्टी पुढे नेण्यात आणि शेवटच्या घटकापर्यंत वितरण सुनिश्चित करण्यात खूप मदत केली आहे"

"आम्ही देशाला नवीन सामर्थ्य, वेग आणि व्याप्ती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक प्रमुख साधन बनवले आहे"

"आम्ही आज सर्वसामान्य जनतेला प्रथम तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत"

"तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याच्या वापराच्या शक्यताही त्याप्रमाणात वाढतात"

"ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार हे सुशासन आणि राहणीमान सुलभतेसाठी आमची वचनबद्धता दृढ करण्याचे आणखी एक माध्यम आहे"

Posted On: 27 MAY 2022 12:27PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत ड्रोन महोत्सव 2022 या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यांनी किसान ड्रोन चालकांशी संवाद साधला. खुली ड्रोन प्रात्यक्षिके पाहिली आणि ड्रोन प्रदर्शन केंद्रातील स्टार्टअप्सशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमरगिरीराज सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, भूपेंद्र यादव, अनेक राज्यमंत्री आणि ड्रोन उद्योगातील प्रमुख तसेच उद्योजक उपस्थित होते. पंतप्रधानांनी 150 ड्रोन चालकांना पायलट प्रमाणपत्रेही दिली.

ड्रोन क्षेत्राबद्दलची आवड आणि त्यातील स्वारस्य पंतप्रधानांनी मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केले. ड्रोन प्रदर्शन आणि उद्योजकांची ध्येयासक्ती तसेच या क्षेत्रातील नवोन्मेषता पाहून खूप प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी शेतकरी आणि तरुण अभियंत्यांशी संवाद साधला. ड्रोन क्षेत्रातील ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे, त्यातूनच भारताची ताकद आणि आघाडीच्या स्थानावर झेप घेण्याची इच्छा दिसत आहे. रोजगार निर्मितीसाठी हे क्षेत्र मोठ्या संधी उपलब्ध करत आहे असे ते म्हणाले."

बरोबर आठ वर्षांपूर्वीचा तो काळ होता जेव्हा आम्ही भारतात सुशासनाचे नवीन मंत्र लागू करण्यास सुरुवात केली होती. किमान सरकार आणि कमाल प्रशासनाचा मार्ग अवलंबत आम्ही राहणीमान सुलभ करणे, व्यवसाय सुलभता याला प्राधान्य दिले. सबका साथ सबका विकास या मार्गावर पुढे जात आम्ही देशातील प्रत्येक नागरिकाला सुविधा आणि कल्याणकारी योजनांशी जोडले, असे सांगत पंतप्रधानांनी, आठ वर्षांपूर्वी केलेल्या नव्या सुरुवातीची आठवण करून दिली.

पूर्वीच्या सरकारच्या काळात तंत्रज्ञान ही समस्येचा मानली जात होती. त्याला गरीब विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे 2014 पूर्वीच्या कामकाजात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनता होती. तंत्रज्ञान शासनाच्या कामकाजाचा भाग होऊ शकले नाही.  याचा सर्वाधिक त्रास गरीब, वंचित आणि मध्यमवर्गीयांना झाला हे पंतप्रधानांनी निदर्शनाला आणून दिले.

मूलभूत सुविधांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया खूपच किचकट होती. त्यामुळे उपेक्षेची आणि भितीची भावना निर्माण व्हायची याची आठवण त्यांनी करून दिली. काळानुरूप बदलले तरच प्रगती शक्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाने संपृक्ततेची दृष्टी पुढे नेण्यात आणि शेवटच्या घटकापर्यंत वितरण सुनिश्चित करण्यात खूप मदत केली आहे. आणि मला माहित आहे की या गतीने पुढे जाऊन आपण अंत्योदयाचे ध्येय साध्य करू शकतो तसेच जन धन, आधार, मोबाईल (JAM) या त्रिसूत्रीचा वापर करून गरीब वर्गाला त्यांचे हक्क प्रदान करण्यास सक्षम आहोत, असे ते म्हणाले. गेल्या 8 वर्षांच्या अनुभवाने माझा विश्वास आणखी दृढ होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आम्ही तंत्रज्ञानाला नवीन शक्ती, वेग आणि व्याप्ती देण्यासाठी देशाकरता एक प्रमुख साधन बनवले आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला.

देशाने विकसित केलेल्या मजबूत युपीआय फ्रेमवर्कच्या मदतीने आज लाखो कोटी रुपये गरिबांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आता थेट सरकारकडून मदत मिळत आहे असे ते म्हणाले.

ड्रोन तंत्रज्ञान एका मोठ्या क्रांतीचा आधार कसा बनत आहे याचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी, पंतप्रधान स्वामीत्व योजनेचे उदाहरण दिले. या योजनेअंतर्गत प्रथमच देशातील खेड्यापाड्यातील प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल मॅपिंग करून लोकांना डिजिटल मालमत्ता कार्ड दिले जात आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार हे सुशासन आणि राहणीमान सुलभतेसाठी आमची वचनबद्धता दृढ करण्याचे आणखी एक माध्यम आहे.  ड्रोनच्या रूपात, आम्हाला एक स्मार्ट साधन मिळाले आहे जे सामान्य लोकांच्या जीवनाचा भाग बनणार आहे'',  पंतप्रधान म्हणाले.

संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी, पर्यटन, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  येत्या काळात या तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रगती पुनरावलोकने आणि केदारनाथ प्रकल्पांच्या उदाहरणांद्वारे अधिकृत निर्णय घेताना ड्रोनचा वापर केला याबद्दल पंतप्रधानांनी सांगितले.

ड्रोन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यात आणि त्यांचे जीवन आधुनिक बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.

रस्ते, वीज, ऑप्टिकल फायबर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाची साक्ष गावोगावी दिसू लागली आहे. तरीही, शेतीचे काम जुनाट पद्धतीने केले जात आहे, यामुळे अडचणी, कमी उत्पादकतेसह नुकसान आहे. जमिनीच्या नोंदीपासून ते पूर आणि दुष्काळ निवारणापर्यंतच्या कामांबाबत महसूल विभागावर सतत अवलंबून राहावे लागते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ड्रोन हे प्रभावी साधन म्हणून उदयाला आले आहे, असे ते म्हणाले.  कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे, तंत्रज्ञान यापुढे शेतकऱ्यांसाठी भितीदायक राहणार नाही हे सुनिश्चित झाले आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

ड्रोन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यात आणि त्यांचे जीवन आधुनिक बनवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.

रस्ते, वीज, ऑप्टिकल फायबर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या आगमनाची साक्ष गावोगावी दिसू लागली आहे. तरीही, शेतीचे काम जुनाट पद्धतीने केले जात आहे, यामुळे अडचणी, कमी उत्पादकतेसह नुकसान आहे. जमिनीच्या नोंदीपासून ते पूर आणि दुष्काळ निवारणापर्यंतच्या कामांबाबत महसूल विभागावर सतत अवलंबून राहावे लागते. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ड्रोन हे प्रभावी साधन म्हणून उदयाला आले आहे, असे ते म्हणाले. कृषी क्षेत्राला मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे, तंत्रज्ञान यापुढे शेतकऱ्यांसाठी भितीदायक राहणार नाही हे सुनिश्चित झाले आहे असेही पंतप्रधान म्हणाले.

पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान आणि त्याचे शोध हे उच्चभ्रू वर्गासाठी मानले जात होते याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. आपण आज प्रथम सर्वसामान्य जनतेला तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ड्रोनवर बरेच निर्बंध होते. आम्ही फार कमी वेळात बहुतांश निर्बंध हटवले आहेत. उत्पादन सलग्न प्रोत्साहन सारख्या (पीएलआय)  योजनांद्वारे आम्ही भारतात एक मजबूत ड्रोन उत्पादन परिसंस्था तयार करण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहोत. तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याच्या वापराच्या शक्यताही त्याप्रमाणात वाढतात असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

 

***

S.Thakur/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828727) Visitor Counter : 344